SHINDE SENA INTERNAL RIFT OVER MLC ELECTION CANDIDATES MAHARASHTRA POLITICS Saam tv
महाराष्ट्र

Political News : शिवसेनेत पुन्हा बंडाळी? विधानपरिषद निवडणुकीसाठी ८ जणांची नावे चर्चेत, एकनाथ शिंदे कोणाला संधी देणार?

Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीआधी शिंदे गटात उमेदवारीवरून मतभेद. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावावरून विरोध.

Alisha Khedekar

  • विधान परिषद निवडणुकीआधी शिंदे गटात अंतर्गत मतभेद

  • गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावावरून वाद

  • नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी

  • अंतिम निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर होताच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. यामध्ये नऊ जागांसाठी नियमित निवडणूक होणार असून एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. महायुतीच्या वाट्याला आलेल्या नऊ जागांपैकी दोन जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या दोन जागांवरूनच शिंदे गटात अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे चित्र दिसत आहे.

शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी आठ जणांची नावे चर्चेत आहेत. यात नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि बच्चू कडू यांचा समावेश आहे. यापैकी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांची नावे आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. गोऱ्हे या सध्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, तर बच्चू कडू यांनी अलीकडेच एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांच्या उमेदवारीला बळ मिळाल्याचे संकेत आहेत.

मात्र, या दोन्ही नावांवरून शिंदे गटातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी मागणी पुढे येत आहे. विशेषतः बच्चू कडू यांच्या बाबतीत विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा आणि महायुती सरकारवर केलेल्या टीकेचा उल्लेख करत विरोध केला जात आहे. तसेच शिवसेनेतील फुटीनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळेही काही नेते अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पक्षातील असंतोष दूर करत अंतिम उमेदवारांची निवड करणे त्यांच्यासाठी तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे कोणती रणनीती आखतात आणि कोणाला उमेदवारी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरच शिंदे गटात निर्माण झालेली ही अंतर्गत खळबळ महायुतीच्या राजकारणावरही परिणाम करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FIFA prize money: स्पेन मालामाल! वर्ल्डकप हरूनही मेस्सीच्या अर्जेंटिनावर कोट्यवधींचा पाऊस; प्रत्येक टीमवर फिफाने किती केली पैशांची बरसात?

FIFA World Cup 2026 : फायनल सामन्यात मेस्सीची जादू पडली फिकी; फेरान टोरेसच्या निर्णायक गोलने स्पेनने 16 वर्षांनी जिंकला वर्ल्डकप

IND vs ENG: रोहितचे शतक व्यर्थ; अवघ्या ८ चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलला; आठ वर्षांनंतर इंग्लंडनं मालिका जिंकली

प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल! IAS अधिकारी अन् तहसीलदारांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

लॉर्ड्सवर हिटमॅनचे वादळ! इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माचे वादळी शतक, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय

SCROLL FOR NEXT