NCP Jansamman Yatra Nashik Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar Speech: 'लोकसभेला जोरदार झटका लागला, चूक झाली', अजित पवारांनी नाशिकच्या शेतकऱ्यांची माफी मागितली; नेमकं काय म्हणाले?

NCP Jansamman Yatra Nashik Latest News: या सभेत बोलताना अजित पवार यांनी १७ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले तसेच ही योजना सुरू ठेवायची असल्यास आम्हाला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Gangappa Pujari

रुपाली, बडवे|ता. ९ ऑगस्ट २०२४

आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने जनसन्मान यात्रेची घोषणा केली आहे. आज नाशिकमध्ये ही यात्रा होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी १७ ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले तसेच ही योजना सुरू ठेवायची असल्यास आम्हाला निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

काय म्हणाले अजित पवार?

"लाडकी बहीण योजनेत ज्यांनी फॅार्म भरले आहेत, त्यांच्या खात्यांची माहिती आमच्याकडे आली आहे. ॲानलाईन फॅार्म भरताना काही अडचणी येत असल्याच्या तक्रारी येत आहेत, त्यावर काम सुरू आहे येत्या १७ तारखेला तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत. तुम्हाला भाऊबीज देऊ ते पैसे पोहचले असतील," असा शब्द अजित पवार यांनी दिला.

तसेच "विरोधकांना याच दुःख आहे, वेळ मारुन देण्याचे काम असल्याचे ते म्हणतात मात्र आम्हाला लाँग टर्म राजकारण करायच आहे, मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, खोटा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला बळी पडू नका, ही योजना बंद करण्याकरीता केलेली नाही, ती कायमस्वरुपी चालू राहणार आहे. ही योजना चालू राहायची म्हटल्यावर तुम्ही आम्हाला तिथे पाठवलं पाहिजे, त्यासाठी बटण दाबल पाहिजे," असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

लोकसभेला झटका बसला!

"मी चांगली काम घेऊन तुमच्यापुढे आलो आहे. आता कांदा निर्यात बंदी करायची नाही, ह्यावर आमच एकमत झालेले आहे, लोकसभेला दिलेला झटका जोरदार लागला आहे, कंबर मोडायची वेळ आहे चूक झाली माफ करा. जो काम करतो तोच चुकतो, अब की बार ४०० पार मुळे देखील झटका लागला कोणत्याही परिस्थितीत कांदा निर्यात बंदी करायची नाही," असे म्हणत अजित पवार यांनी लोकसभेला कांदा निर्यातबंधीच्या निर्णयाचा फटका बसल्याची कबुली दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT