Ajit Pawar  Yandex
महाराष्ट्र

Assembly Election 2024: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं! विधानसभेला 'इतक्या' जागांवर निवडणूक लढणार; कार्यकर्त्यांना दिले महत्वाचे आदेश

Maharashtra Assembly Election 2024: 'काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत. हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, शामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार आपल्याबरोबर आहेत,' असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Gangappa Pujari

सुनिल काळे, ता. ३१ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेचे बिगुल वाजण्याआधीच महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.

विधानसभेला राष्ट्रवादी किती जागा लढणार?

विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने कंबर कसली आहे. जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जवळपास ६० जागा मिळतील, असे सर्वात महत्वाचे विधान अजित पवार यांनी केले आहे. युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपण ६० एक जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे.

अजित पवार यांचे महत्वाचे विधान!

"आमची जागा वाटपात तसेच इतर जागांबाबत चर्चा सुरू आहे. आपल्याकडे सध्या असलेले आमदार आहेतच तिथे आपल्याला काम करायचे आहे. त्या ५४ जागा आपल्याला मिळतील आणि अजून 60 जागांपर्यंत आपल्याला मतदारसंघांमध्ये काम करायचे आहे. काँग्रेसचे आमदार आपल्यासोबत आहेत. हिरामण खोसकर आणि सुलभा खोडके, झिशान सिद्दीकी, शामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार आपल्याबरोबर आहेत," असे अजित पवार यावेळी म्हणाले.

कार्यकर्त्यांना दिले महत्वाचे आदेश!

तसेच "आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे आहे. तुम्हाला आम्ही तशी यादी देऊ. तुम्ही अजितबात गाफील राहू नका. आपल्याला न मिळणाऱ्या जागेवर शक्ती खर्च करु नका. संवाद साधताना आपलेपणाने बोला. शांतपणाने, डोक्यावर बर्फ ठेऊन संवाद साधा. उगाच बाहेर काढा रे त्याला, असं करु नका. बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच बाहेर जावं लागेल. कृपा करुन काम करा, दुर्लक्ष करु नका," असे म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांनाही विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, महिलेसह ३ चिमुकले गंभीर जखमी

Kalyan: अधिकाऱ्यांना मारले, आता ते आम्हाला पण मारतील; फेरिवाल्यांविरोधात कारवाई करा, शिंदेंचे नगरसेवक आक्रमक

SCROLL FOR NEXT