मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडेल - दत्तात्रय भरणे  भारत नागणे
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडेल - दत्तात्रय भरणे

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेबाबत सूचक वक्तव्य केले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारत नागणे

पंढरपूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासनाने घालून दिलेले नियम आणि वारकरी परंपरांचा मेळ साधून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आषाढी वारीचे योग्य नियोजन करावे असे सांगत, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणारी आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा देखील निर्विघ्नपणे पार पडेल असा विश्वास वन राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे व्यक्त केला.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज आषाढी वारीच्या नियोजनाबाबत संबंधित विभाग प्रमुखांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या महापूजेबाबत सूचक वक्तव्य केले. Dattatray Bharane speaks About Ashadhi Wari Mahapuja

हे देखील पहा -

धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्य धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्यांची अलीकडेच पंढरपुरात एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना इशारा देण्यात आला होता.

मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवूनच पंढरपूरला आषाढीच्या महापूजेसाठी यावे. अन्यथा मुख्यमंत्र्यांना महापूजेसाठी पंढरपुरात येवू देणार नाही असा इशारा दिला होता. पालकमंत्री भरणे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीच मुख्यमंत्र्यांना हा थेट इशारा दिल्याने खळबळ उडाली होती.

येत्या 20 जुलै रोजी आषाढीचा सोहळा साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापूजा आणि वारीचे नियोजन कऱण्यासाठी पालकमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची एक बैठक देखील पार पडली.

यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या महापूजे संबंधी चर्चा झाली. बैठकीनंतर धनगर समाजाने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या इशाराकडे लक्ष वेधले असता, पालकमंत्री भरणे यांनी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांचे समाधान केले जाईल.‌ महापूजेसाठी सर्वांचे सहकार्य घेणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते होणारी आषाढीची शासकीय महापूजा ही निर्विघ्नपणे पार पडले असा विश्वासही व्यक्त केला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांनी समन्वय ठेवून लसीकरण, स्वच्छता, आरोग्य तपासणी, शुध्द पाण्याचा पुरवठा, आवश्यक ठिकाणी तात्पुरती स्वच्छता गृहे, वाखरी पालखीतळ स्वच्छता याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT