Ahmednagar News: एमपीएससी (MPSC) टॉपर दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दर्शनाची हत्या (Darshana Pawar Death Case) करणारा तिचा मित्र राहुल हांडोरेला (Rahul Handore) अटक केली. दर्शनाच्या मारेकऱ्याला अटक केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दर्शनाच्या आईने आणि भावाने आरोपी राहुलला आमच्या ताब्यात द्या, नाहीतर सरकारने त्याला फाशी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दर्शन पवारची हत्या करणाऱ्या रोहित हांडोरेला पोलिसांनी मुंबईतून अटक केली. राहुलच्या अटकेनंतर दर्शनाच्या आईने त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली. राहुलने माझ्या बहिणीचा घात केला आहे. त्याला आमच्या ताब्यात द्या नाहीतर त्याला मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया तिच्या भावाने दिली आहे. तर, 'माझ्या मुलीचे त्याने जसे तुकडे केले तसे त्याचे करु, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते. त्यामुळे त्याला आमच्या ताब्यात द्या.', अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या आईने दिली आहे.
तसंच, 'माझी मुलगी दर्शना गेली तशा इतरांच्या मुली जाऊ नये. यासाठी राहुलला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि ती शिक्षा मीच देऊ शकते. त्यामुळे त्याला माझ्या ताब्यात द्या. माझ्या मुलीचे जसे तुकडे केले तसे तुकडे आम्ही त्याचे करु. नाही तर सरकारने त्याला फाशी द्यावी.', अशी मागणी देखील दर्शनाच्या आईने केली आहे. हुशार आणि मेहनती असणाऱ्या दर्शनाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर आणि गावावर शोककळा पसरली आहे.
मुळची अहमदनगरची असणाऱ्या दर्शनाने एमपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवले होते. एमपीएसी परीक्षेत ती राज्यात तिसरी आली होती. एमपीएससी परीक्षेसाठी दर्शनाने खूप मेहनत घेतली होती आणि तिच्या या प्रयत्नांना यश देखील आले होते. दर्शनाच्या यशामुळे तिचे कुटुंबीय खूपच आनंदात होते. तिची वन विभागाच्या आरएफओ पदावर निवड झाली होती. एमपीएससी पास होण्याचे दर्शनाचे स्वप्न पूर्ण झाले खरे पण अधिकारी होण्यापूर्वीच तिचा घात झाला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आलेल्या दर्शनाची तिच्या जवळच्या मित्रानेच हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दर्शना पवार आणि राहुल हांडोरे हे एकमेकांचे जवळचे नातेवाईक होते. दोघेही एमपीएससीच्या परीक्षेची एकत्र तयारी करत होते. एमपीएससी परीक्षेत पास होत दर्शनाला यश मिळाले होते. पण राहुल हांडोरेला अद्याप यश आले नव्हते. राहुलला दर्शना खूप आवडत होती. त्याला तिच्यासोबत लग्न करायचे होते. यासंदर्भात तो तिच्या कुटुंबीयांशी बोलला सुद्धा होता.
पण एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर दर्शनाचे कुटुंबीय तिच्यासाठी मुलगा शोधत होते. त्यांनी दर्शनाचे लग्न दुसऱ्या मुलासोबत जमवले देखील होते. त्यामुळे राहुल हांडोरे अस्वस्थ झाला होता. त्याने तिच्या कुटुंबीयांकडे मी सुद्धा लवकरच एमपीएससी परीक्षा पास होऊन अधिकारी होईल असे सांगत वेळ मागितला होता. पण दर्शनाच्या घरचे तयार झाले नाहीत. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आणि दर्शना काहीच उत्तर देत नसल्यामुळे राहुल संतप्त होता. तो दर्शनाला घेऊन राजगडावर ट्रेकिंगला गेला आणि त्याचठिकाणी तिची हत्या केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.