अतिउत्साही युवकांचा कारच्या बोनेटवरती बसुन धोकादायक स्टंट! मंगेश कचरे
महाराष्ट्र

अतिउत्साही युवकांचा कारच्या बोनेटवरती बसुन धोकादायक स्टंट!

मंगेश कचरे

बारामती : मागील महिण्यात दिवे घाटामध्ये एका नवरी मुलीने चारचाकी गाडीच्या बोनेटवरती बसून लग्नाला जात असतानाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात वायरल झाला होता. ती घटना ताजी असतातनाच शिवाय त्या संबंधीत मुलीवरती पोलिस कारवाई झाली असतानाही अशीच एका घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवर दोन अतिउत्साही युवकांनी कारच्या बोनेटवरती बसुन धोकादायक स्टंट करतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. Dangerous stunts of youngsters sitting on the bonnet of a car

हे देखील पहा-

पुरंदर तालुक्यातील भिवरी गराडे रोडवरील चतुर्मुख मंदिर परिसरात अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात तसेच तिथे असणारे निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी सतत या परिसारामध्ये पर्यटकांची गर्दी असते. मात्र गर्दी दिसताच काहीतरी स्टंट नौटकी करायच्या नादात अशाच काही युवकांनी चतुर्मुख मंदिराच्या बाजूला असलेल्या धोकादायक घाटामधून अतिउत्साही दोन युवकांनी चित्तथरारकरीत्या गाडीच्या बोनेटवर बसुन प्रवास केला आहे.

गाडी चालकाला पुढील काही भाग दिसत नसल्याने बोनटवरी एक युवक हातवारे करत चालकाला रस्ता सांगतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अशा पद्धतीने धोकेदायकरित्या कार चालवून जीवघेणा प्रवास केल्याने सर्व भाविक त्यांच्या कृत्याकडे पाहतच राहिले. या अतिउत्साही युवकांना कायद्याच्या धाकाचा ही विसर पडल्याचे चित्र या ठिकाणी पहायला मिळाले.

Edited By-Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indurikar Maharaj Kirtan: 'स्वार्थासाठी धर्माचे भांडवल करू नका, गरिबांच्या पोरांचा बळी घेऊ नका', इंदुरीकर महाराजांनी नेत्यांना फटकारले

Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

Shukraditya Rajyog: सूर्य-शुक्राच्या युती बनला शुक्रादित्य राजयोग; 'या' राशींच्या सर्व इच्छा होणार पूर्ण

Maharashtra Politics : महायुतीसाठी २०९ जागांवर अनुकूल वातावरण, शिवसेनेच्या सर्व्हेक्षणातून दावा

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT