लातूर: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूरात 70 फूट उंचीचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज पुतळ्याचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार झाल्यापासून प्रशासनाकडून वाईट वागणूक मिळत असल्याचे जाहीर भाषणात खासदार सुधाकर शृंगारे (Sudhakar Shrungare) यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासमोर विषय मांडण्याचं साकडं रामदास आठवले (Ramdas Athawale) आणि देवेंद्र फडणवीस यांना घातलं आहे. यामुळे खुद्द खासदार शृंगारे हे जातीव्यवस्थेचे बळी ठरले काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. (Dalit MPs like me get bad treatment; Serious allegations by MP Sudhakar Shrungare)
हे देखील पहा -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 70 फूट उंचीच्या पुतळ्याचे काम सुरू असताना मनपाच्या आयुक्तांनी मला वरून दबाव आहे, पुतळ्याचे काम थांबवा म्हणून खासदार सुधाकर शृंगारे यांच्या पीएला फोन करून सांगण्यात आले. तर शासकीय कार्यक्रम पत्रिकेत खासदार याचं नाव टाकलं पाहिजे असा प्रोटोकॉल असताना कार्यक्रम पत्रिकेत नाव टाकलं जात नाही. योजना या केंद्र सरकारच्या असताना मी दिल्लीला गेलो की, उदघाटन करून घेतात अशी अपमानास्पद वागणूक मिळत आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयी बोलावं अशी मागणी जाहीर सभेत लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी केली आहे.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाला विरोध करणारी ही कसली महानगरपालिका? खरं तर महानगपालिकेने विरोध करायला नको होता अशी प्रतिक्रिया व्यक्त करताना मी संविधानाचं रक्षण करण्यासाठी दिल्लीत आहे. खासदाराला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करून टाकू असा दम मंत्री रामदास आठवले यांनी भरला. खासदार असेल मंत्री असेल तो कोणत्याही पक्षाचा असो प्रोटोकॉल पाळला पाहिजे अंस आठवले म्हणाले.
खासदार सुधाकर शृंगारे यांना लातूर येथील अधिकारी अपमानित करत असतात शासकीय कार्यक्रमात पत्रिकेवर नाव लिहिणे हा प्रोटोकॉल आहे. पण त्या कार्यक्रम पत्रिकेवर नाव लिहिलं जात नाही, सतत अपमानित केलं जातं असल्याची खंत व्यक्त केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे तुम्ही खासदार झालात, कोणाच्या बापाच्या लाचारीवर खासदार झाला नाहीत. खासदाराला अपमानित करणाऱ्या अधिकाऱ्यांना आता संसदेच्या कटघरात उभं करून जरब बसवणार तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.