Dada Bhuse News Saam TV
महाराष्ट्र

Dada Bhuse News: सुषमा अंधारेंच्या अडचणीत वाढ; ललित पाटील प्रकरणावरून दादा भुसेंकडून नोटीस

Dada Bhuse Vs Sushama Andhare: पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असे उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलाय.

Ruchika Jadhav

Maharashtra Political News:

ललित पाटील प्रकरणावरून राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर सातत्याने आरोप आणि टीकास्त्र सोडण्यात येतायत. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केला होता. या आरोपाला दादा भुसेंकडून नोटीस पाठवण्यात आलीये.

या प्रकरणी मंत्री दादा भुसे यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना बदनामी केल्या संदर्भात त्यांच्या वकीलांमार्फत नोटीस पाठवली आहे. या बदनामी प्रकरणी पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी असा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आलाय.

सुषमा अंधारेंनी तसे न केल्यास त्यांच्यावर दादा भुसे मानहानीचा दावा दाखल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील काही दिवसांपूर्वी दाद भुसेंवर असाच हल्लाबोल केला होता. त्यांच्यावर भुसेंनी मानहानीचा दावा दाखल केलाय.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

नाशिकच्या ललित पाटील ड्रग्स प्रकरणात नाशिकचे पालमंत्री दादाजी भुसे यांचा सहभाग आहे, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला होता.

ललित पाटील प्रकरणात मुंबई पोलिसांनी आपल्या शोध कार्याला वेग आणलाय. त्यानुसार मंगळवारी मध्यरात्री २ वाजेपासून मुंबई पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. यावेळी गिरणा नदी पात्रात पोलिसांना कोट्यवधींचं ड्रग्स सापडलं आहे.ललितचा ड्रायव्हर सचिन वाघची चौकशी केली असता त्या दरम्यान ही माहिती समोर आलीये.

त्यानुसार मुंबई पोलिसांच्या टीमने रात्री २ वाजता नदीत अंडरवॉटर कॅमेऱ्याच्या मदतीने अमली पदार्थांचा शोध घेतला. सचिनने नदिपात्रा अंमली पदार्थांचे दोन पोते फेकले होते. हा ड्रग्ससाठा ४० ते ५० किलोचा असून त्याची किंमत जवळपारस १०० कोटी रुपये एवढी असल्याचं पोलिसांनी म्हटंलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: बायको अन् २ मुलांची हत्या, नंतर तरुणाने धावत्या ट्रेनसमोर उडी मारत संपवलं आयुष्य

Maharashtra News Live Update: केतनच्या आई-वडिलांना अश्रू अनावर

काश्मीरपासून दिल्ली-NCR पर्यंत धरती हादरली; अफगाणिस्तानात 6.2 तीव्रतेचा भूकंप, अनेक भागांत भीतीचे वातावरण

Sindhudurg: भयंकर! स्विमिंग पूलमध्ये उंचावरून उडी मारली, तरुणाचा जागीच मृत्यू

Masala Dosa Recipe: सकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी झटपट बनवा हॉटेल स्टाईल मसाला डोसा; वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT