Dada Bhuse  Saam Tv
महाराष्ट्र

Dada Bhuse : तुम्हाला लाज, शरम वाटायला हवी; शूटर सलीमच्या पार्टीवरून भुसेंचा बडगुजरांवर हल्लाबोल

Dada Bhuse On Badgujar : मालेगाव येथील विकासकामाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते. या कार्यक्रमात भुसे यांनी ठाकरे गटाचे नेते बडगुजर यांच्यावर निशाणा साधला. दरम्यान शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केले होते.

Bharat Jadhav

(अजय सोनवणे)

Dada Bhuse On Badgujar :

ज्याने आपल्या देशाच्या, मुंबईच्या निरपराध २५७ लोकांचा बळी घेतला. ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले, अशा देशद्रोहीसोबत तुम्ही पार्टी करता. तुम्हाला लाज, शरम वाटायला पाहिजे, अशा शब्दात मंत्री दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर हल्लाबोल केला. मालेगाव येथील विकासकामाच्या कार्यक्रमात पालकमंत्री दादाजी भुसे बोलत होते.

त्यावेळी त्यांनी नाशिकचे ठाकरे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधला. शत्रू दाऊद इब्राहिमचा प्रमुख साथीदार शूटर सलीम कूत्ता याच्या पार्टीत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर दिसल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर दाऊद गँगचा शार्प शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करतानाचे फोटो आणि व्हिडिओ नितेश राणे यांनी विधानसभेत सादर केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीका केले जातेय. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शूटर सलीमसोबत पार्टीवरून दादा भुसे यांनी बडगुजर यांच्यावर हल्लाबोल केला.

भारताचा शत्रू दाऊद इब्राहिम याने यापूर्वी आपल्या देशावर विविध पद्धतीने हल्ले केले. त्या दाऊद इब्राहिमचा प्रमुख साथीदार, शूटर सलीम कूत्ता याच्यासोबत आपल्या नाशिकचे ठाकरे गटाचे नेते महानगर प्रमुख त्याच्या सोबत पार्टी करतांना क्लिप व्हायरल झाली. त्या क्लिपमध्ये सुधाकर बडगुजर, सलीम कूत्ता आणि आणखी काही क्रिमिनल, गँगस्टर हे मे हु डॉन या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

या क्लिपवरून बडगुजर यांच्यावर टीका केली जातेय, परंतु आपला आणि सलीम कुत्ता याचा काही संबंध नसल्याचं बडगुजर म्हणालेत. याप्रकरणी एका मुलाखतीत बोलताना बडगुजर यांनी केलेल्या एका विधानाचा धागा पकडत दादा भुसे यांनी टीकास्त्र डागलं आहे. मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्या व्यक्तीसोबत तुम्ही पार्टी करता तुम्हाला लाज वाटली पाहिजे, शब्दात भुसे यांनी बडगुजर यांच्यावर टीका केली.

सलीम कुत्ताच्या माध्यमातून मुंबईवर विविध ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात आले. यात २५७ लोकांचे दुःख निधन झाले. ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. या बॉम्बस्फोटात अगदी मुंबईचे सेना भवन सुद्धा उडविण्याचा नियोजन करण्यात आलं होतं. हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तो बॉम्ब स्फोट झाला नाही. त्यामुळे सेना भवन वाचलं. त्या आरोपीला टाडा न्यायलयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्या आरोपीसोबत उबाठा गटाचा नेता जे आताच्या घडीला महानगर प्रमुख आहेत. ते सुधाकर बडगुजर. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसवर त्या सलीम कूत्ताच्या सन्मानार्थ पार्टी दिली.

काल मी बडगुजरची मुलाखत बघितली बडगुजर हा मान्य करत नाही. मी तिथे नव्हतो वगैरे असे बोलत नाहीतर आम्ही सार्वजनिक समारंभ अशा काही ठिकाणी भेटलो असेल तर मला आठवत नाही. अरे ज्याने आपल्या देशाच्या, मुंबईच्या निरपराध २५७ लोकांचा बळी घेतला. ७०० पेक्षा जास्त लोक जखमी झालेत, अशा देशद्रोहीसोबत तुम्ही पार्टी करता. तुम्हाला लाज, शरम वाटायला पाहिजे. सभागुहात हा विषय आलेला होता. ही अतिशय गंभीर बाब आहे. हे देश विघातक कृत्य आहे म्हणून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी काल सभागृहात करण्यात आल्याचं भुसे यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT