Cyres mistri and vinayak mete car accident Link
Cyres mistri and vinayak mete car accident Link Saam TV
महाराष्ट्र

Cyrus Mistry: सीटबेल्ट लावला असता तर... सायरस मिस्त्री आणि विनायक मेटे यांच्या कार अपघातातलं कॉमन कनेक्शन आलं समोर

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

पालघर: प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा काल, रविवारी पालघर जिल्ह्यात कार अपघातात निधन झाले. या अपघातात त्यांच्यासह प्रवास करणारे जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला, तर डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल हे गंभीर जखमी झाले. सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. (Cyrus Mistry died in car accident)

अशातच, सायरस मिस्त्री यांचा अपघात का आणि कसा झाला? त्यांना वाचवलं जाऊ शकलं असतं का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जातायत. अपघात झाला तेव्हा सायरस मिस्त्री सीटबेल्ट लावला नव्हता, त्यांनी सीटबेल्ट लावला असता तर, त्यांचा जीव वाचण्याची दाट शक्यता होती असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. काही दिवसांपूर्वी शिवसंग्रमाचे नेते विनायक मेटे यांचंही अशाच कार अपघातात निधन झालं होत. आता या दोन्ही अपघातातलं हे कॉमन कनेक्शन समोर आलं आहे. (Cyrus Mistry was not wearing seat belt)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, सायरस मिस्त्री आणि त्यांच्यासोबत हे पंडोल कुटुंबासह अहमदाबादहून मुंबईकडे येत होते. यावेळी ते मर्सिडीज कारमधून येत होते, ही कार डॉ. अनायता पंडोल या चालवत होत्या, तर दरीयस पंडोल हे पुढच्या सीटवर बसले होते. पुढच्या सीटवर बसलेले डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल या दोघांनीही सीटबेल्ट लावला होता. मात्र, मागच्या सीटवर बसलेले सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल यांनी मात्र सीटबेल्ट लावलेला नव्हता.

जेव्हा कार पालघर जिल्ह्यातील चारोटी येथील ब्रिजवर धडकली तेव्हा मर्सिडीज गाडीच्या एअर बॅग उघडल्या गेल्या आणि पुढच्या दोन्ही लोकांना कमी दुखापत झाली. मात्र मागच्या सीटवर बसलेले सायरस मिस्त्री आणि जहांगीर दिनशा पंडोल या दोघांनीही सीटबेल्ट्स लावले नसल्याने त्यांचे डोके जोरदार वेगात पुढील सीटवर आदळले.

मागील सीटच्या एअरबॅग्सजी उघडल्या गेल्या, मात्र सीटबेल्ट लावला नसल्याने ते बाहेर फेकल्या गेल्याने गंभीर जखमी होऊन जागेवरच त्यांचा मृत्यू झाला. तर डॉ. अनायता पंडोल आणि दरीयस पंडोल या दोघांनाही अनेक फॅक्चर झाल्याने त्यांच्यावर वापीतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

विनायक मेटेंनीही सीटबेल्ट लावला नव्हता

दरम्यान शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचंही १४ ऑगस्ट २०२२ ला कार अपघातात निधन झालं होत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ हा भीषण अपघात झाला होता. हा अपघात झाला तेव्हा, विनायक मेटे हे मागच्या सीटवर बसले होते आणि त्यांनी सीटबेल्टही लावला नसल्याचे उघड झाले होते. मेटे यांच्या गाडीला अनोळखी वाहनाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला होता. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांच्या रुग्णालयात पोहोचण्यापुर्वीच मृत्यू झाला होता.

अपघातांची चौकशी

१४ ऑगस्टला विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले तेव्हा राज्य सरकारने अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आता ४ सप्टेंबरला जेव्हा सायरस मिस्त्री यांचेही अपघाती निधन झाल्याने राज्य सरकारने याही अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीतून अपघाताचं नेमकं कारण समोर येणार आहे. मात्र, वाहतुकीचे नियम न पाळणे यामुळे गेल्या एका महिन्याच्या आता महाराष्ट्रातील दोन दिग्गजांना आपले प्राण गमवावे लागले आहेत हे मात्र नक्की.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : यांच्या ४ पिढ्यांनी दिल्लीवर राज्य केलं, पण..., PM नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडी आणि काँग्रेसवर हल्लाबोल

Today's Marathi News Live: पुण्यातील हिंगणे मळ्यात हाय टेन्शनची विद्युतवाहिनी तुटली

Prakash Ambedkar: शरद पवार, उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर भाजपसोबत जातील, प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Video: 48 पैकी 49 जागाही Uddhav Thackeray जिंकून आणू शकतात! देवेंद्र फडणवीसांच्या विधान ऐकून एकच हास्यकल्लोळ

Akola Accident: देव तारी त्याला कोण मारी! ट्रक आणि कारचा भीषण अपघात; कारमधील सर्वजण सुखरुप

SCROLL FOR NEXT