मुंबईत पावसानंतर 'जोवाद' चक्रीवादळाचा धोका; हवामान खात्याचा अलर्ट ! Saam Tv
महाराष्ट्र

मुंबईत पावसानंतर 'जोवाद' चक्रीवादळाचा धोका; हवामान खात्याचा अलर्ट !

राजधानी मुंबईत (Mumbai) संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवार-बुधवारी दोन दिवस अवकाळी पावसाने राज्यभरात झोपडपून काढलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राजधानी मुंबईत (Mumbai) संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवार-बुधवारी दोन दिवस अवकाळी पावसाने राज्यभरात झोपडपून काढलं. तर, रात्रीपासून पाऊस रिमीझम सुरु आहे. महाराष्ट्रातील मुंबई-पुणे आणि कोकणात 3 डिसेंबरपर्यंत पावसाचा इशारा, हवामान खात्याने (IMD) जारी केला आहे. यासोबतच आता हवामान खात्याने 'जोवाद' चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे.

हे देखील पहा-

डिसेंबर महिन्यात अचानक आलेल्या पावसाबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीपमध्ये चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

केवळ महाराष्ट्रातच (Maharashtra) नव्हे, तर इतर राज्यातही अवकाळी पाऊस पडत आहे. कमी दाबामुळे आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हवामान खात्याने 'जोवाद' चक्रीवादळाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामानातील बदलामुळे आज देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच 3 डिसेंबरला पावसाचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्याचे चक्री वादळात रूपांतर होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT