Kolhapur Rally Saam TV
महाराष्ट्र

Kolhapur Rally: लग्नासाठी पोरगी, स्वस्त मटन अन् समुद्र मिळालाच पाहिजे; कोल्हापुरकरांची अतरंगी मागण्यांसाठी रॅली

Cycle Rally Movement: अनेक मजेदार मागण्या घेऊन मंगळवार पेठेतल्या चिक्कूमंडळाची गँग थेट प्रयाग चिखलीतल्या पंचगंगा नदीच्या संगमावरती पोहोचलीये. अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली.

Ruchika Jadhav

रणजीत माजगावकर

Movement:

कोल्हापूर हे आंदोलनाचं शहर म्हणून ओळखलं जातं. या कोल्हापुरात अनेक मोठमोठे आंदोलन झालेत. त्यामध्ये सरकार केंद्र सरकारला देखील आपल्या आंदोलनाची दखल घेण्यास कोल्हापूरकरांनी भाग पाडले. मात्र याच कोल्हापुरात कधी कधी अशी हटके आंदोलने होतात जी देशभर गाजतात.

त्याच कोल्हापुरात आज एक अशी गमतीशीर सायकल रॅली निघाली ज्याची चर्चा सुद्धा आता अख्ख्या कोल्हापुरात रंगलीये. कोल्हापुरातल्या खासबाग मैदान येथून प्रयाग चिखली इथं असणाऱ्या पंचगंगा नदीच्या संगमापर्यंत ही सायकल रॅली निघालीये. सध्या या रॅलीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे या रॅलीमध्ये सायकलला लावण्यात आलेल्या फलकांमुळे.

या फलकांवर लग्नासाठी पोरगी मिळालीच पाहिजे, कोल्हापुरात समुद्र झालाच, पाहिजे मटन स्वस्त झालंच पाहिजे, पेट्रोल फुकट मिळालेच पाहिजे. अशा अनेक मजेदार मागण्या घेऊन मंगळवार पेठेतल्या चिक्कूमंडळाची गँग थेट प्रयाग चिखलीतल्या पंचगंगा नदीच्या संगमावरती पोहोचलीये.

अभिनेत्री माधुरी दीक्षितचा फोटो लावलेल्या सायकलचे पूजन करून या रॅलीला सुरुवात झाली. एकीकडे मजेदार फलक असणाऱ्या या सायकल रॅलीचा उद्देश मात्र सर्वांच्याच भल्याचा होता. तो म्हणजे नागरिकांनी सायकलचा वापर करून प्रदूषण टाळले पाहिजे आणि आपलं आरोग्य सुद्धा जपलं पाहिजे.

कोल्हापूर शहरातील खासबाग ते मिरजकर तिकटी, बिनखांभी गणेश मंदिर, महाद्वार रोड करत रॅली शिवाजी पुलावरून मुख्य मार्गावरून प्रयाग चिखलीपर्यंत पोहोचली. ही अनोखी सायकल रॅली पाहून अनेकांचे चेहरे अगदी बघण्यालायक झाल्याचं दिसून आलं. या रॅलीत अगदी वृद्ध व्यक्ती देखील सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President: चर्चा ६ नावांची; वर्णी मात्र महाराष्ट्राच्या राज्यपालांची, राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यामागे काय आहे भाजपचा राजकीय डाव?

Hair Care Tips: केसांना दही लावल्याने होतात 'हे' भन्नाट फायदे

Video : तेरे जैसा यार कहाँ... गाणं म्हणणारे तहसीलदार निलंबित, निरोप समारंभाची पोस्ट पडली महागात

Maharashtra Politics : शिंदेसेनेला हादरा, नाराज नेता भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत

Horoscope Monday : सोमवार ठरणार भाग्याचा, रखडलेली कामे होणार पूर्ण; वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT