Hemant Nagrale Fake fb Account Saam TV
महाराष्ट्र

Cyber Crime: सावधान! माजी पोलीस आयुक्तांच्या नावे मॅसेज आल्यास काळजी घ्या; हेमंत नगराळेंनी दिली धक्कादायक माहिती

Hemant Nagrale Fake fb Account: नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सुरज सावंत

Hemant Nagrale: सध्याच्या घडीची एक मोठी बातमी समोर आली आहे. माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे बनावट फेसबुक पेज सुरु करण्यात आलं आहे. या पेजचा वापर करुन नागरिकांची मोठी फसवणूक केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे सुरु केलेल्या या फेसबुक पेजहून त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील व्यक्तींना मेसेज पाठवले जात आहे. त्यांच्याशी चॅटींग करुन आधी जवळीकता साधली जात आहे. त्यानंतर हे चोरटे थेट नागरिकांच्या बँक खात्यावर डल्ला मारत आहेत.

महत्वाचं कारण सांगूण पैशांची मागणी

जवळीक साधल्यानंतर हे सायबर चोरटे त्या व्यक्तींना आपली अडचण सांगत पैशांची मागणी करत आहेत. माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावाने पैसे मागितल्याने सर्वसामान्य नागरिक याला बळी पडत आहे. नगराळे यांना पैशांची गरज आहे आपण त्यांना मदत करायला हवी असे, समजून नागरिक त्यांना पैसे देत आहेत.

दरम्यान, याबाबत स्वत: हेमंत नगराळे (Hemant Nagrale) यांनी आपल्या फेसबुक पेजवर बनावट पेजचा फोटो अपलोड केला आहे. तसेच नागरिकांनी सतर्क रहावे व संबधित बनावट पेजवरून आलेल्या मेसेजला बळी पडू नये असे आवाहन केले आहे.

विश्वास नांगरे पाटील यांचे बनावट फेसबुक अकाउंट

काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांच्या नावे बनावट फेसबुक पेज बनवण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

सायबर क्राईमच्या (Cyber Crime) अनेक घटना घडत आहेत. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांची टीम सातत्याने काम करत आहे. फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम अशा सोशल मीडिया अकाऊंट्सचा वापर करुन दिवसेंदिवस ऑनलाइन गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशात आता आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्यानंतर माजी पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासोबत देखील अशी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT