ओमायक्रॉनचा धोका; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू Saam Tv
महाराष्ट्र

ओमायक्रॉनचा धोका; अकोला जिल्ह्यात जमावबंदी लागू

कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

जयेश गावंडे

अकोला : कोरोना विषाणूचा (Coronavirus) नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉनचा (Omicron) पहिलारुग्ण राज्यात आढळल्याने राज्यभरातील आरोग्य विभाग आणि प्रशासन अलर्ट झाले आहे. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्ह्यात जमाबंदीचे आदेश लागू केले आहेत. ओमायक्रॉन संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून जिल्ह्यात जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिला. कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.

त्यामुळे'ओमायक्रॉन संसर्गाचा जिल्ह्यात संभाव्य धोका वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता ११७३ चे कलम १४४ अन्वये जिल्ह्यात ५ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजतापासून पुढील आदेशापर्यंत शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी लागू केला. जिल्ह्यातील जमावबंदीच्या कालावधीत रॅली, धरणे, आंदोलन, मोर्चा इत्यादींचे आयोजन करता येणार नाही. तसेच जमावबंदीच्या कालावधीत लसीकरणाचे काम नियमित सुरू राहणार असून, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT