Umesh Kolhe Case Saam TV
महाराष्ट्र

Umesh Kolhe Case : उमेश कोल्हेंची हत्या केल्यानंतर आरोपींनी हॉटेलमध्ये झोडली बिर्याणी पार्टी

उमेश कोल्हे हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अमरावती : भाजपच्या निलंबित राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur sharma) यांच्या वादग्रस्त विधानाला समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हे यांची अमरावतीत हत्या करण्यात आली. देशात खळबळ माजवणाऱ्या या घटनेचा तपास एनआयएने (NIA) हाती घेतल्यानंतर आतापर्यंत ९ आरोपींना अटक करण्यात आलीय. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणी दरम्यान दोन आरोपींनी विशेष न्यायालयात कबुली जबाब दिला आहे. मौलवी मुसिफ अहमद व अब्दुल अरबाज अशी या आरोपींची नावं आहेत. उमेश कोल्हे यांची हत्या (umesh kolhe death) केल्यानंतर अमरावतीतील एका हॉटेलात बिर्याणी पार्टी केली, असं या आरोपींनी न्यायालयात सांगितलं.

मिळालेल्या माहितीनुसार, मौलवी मुसिफ अहमद व अब्दुल अरबाज या दोन आरोपींनी घटनेचा मास्टरमाईंड इरफान शेख याला मस्जिदमध्ये लपवण्यास व पळून जाण्यास मदत केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने काल अमरावती शहरात तीन ठिकाणी छापेमारी केली. एनआयएचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक आणि अधिकारी अमरावतीत तळ ठोकून असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: महाराष्ट्रातील निवडणुकीत कर्नाटकातील घोटाळ्यांच्या पैशांचा वापर, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर आरोप

News Explainer : राजकारणातून काकांचे निवृतीचे संकेत, पुतण्याने हेरली संधी? VIDEO

Raj Thackeray: भविष्यातल्या महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो; चांदीवलीत राज ठाकरे असं का म्हणाले?

Maharashtra Politics : राज्यातील 40-42 मतदारसंघात अमराठींचा बोलबाला; परप्रांतीय मतं कोणाचं टेन्शन वाढवणार? वाचा

Narendra Modi News: पुण्यात PM नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान आरक्षणासाठी घोषणाबाजी; पोलिसांची अचानक धावाधाव

SCROLL FOR NEXT