माणुसकीला काळिमा फासणारी घटना, फक्त 500 रुपयांसाठी निष्ठुर वागणूक (पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

माणुसकीला काळिमा फासणारी घटना, फक्त 500 रुपयांसाठी निष्ठुर वागणूक (पहा व्हिडिओ)

ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोखाडा गावातील आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे - पोटच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी घेतलेल्या उसने पैशाची परतफेड करण्यासाठी एका आदिवासी मजुरावर वेठबिगार करण्याची वेळ आली होती. एवढेच नव्हे तर वेठबिगारी करताना मालकाच्या छळाला कंटाळून अखेर या मजुराने आत्महत्या Suicide केल्याची धक्कादाक घटना उघडकीस आली आहे. जुलै महिन्यात घडलेली ही घटना नुकताची उजेडात आली आहे. मालका विरोधात मोखाडा पोलीस Police ठाण्यात वेठबिगर पद्धत अधिनियम 1976 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही घटना पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोखाडा गावातील आहे. काळू पवार वय वर्ष 48 असे या आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे. काळू पवार आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत होता. गेल्यावर्षी दिवाळी पूर्वी काळूच्या मुलाचा मृतदेह खोल दरीत आढूळ आला होता. त्यावेळी काळू पवारने मुलाच्या कफनसाठी पैसे नसल्याने गावातील रामदास कोरडे या मालकाकडून ५०० रुपये उसने घेतले.

या उसनवार घेतलेल्या ५०० रुपयांची परतफेड करण्यासाठी काळू मजूर म्हणून काम करत आसे. मालकाकडून काळूची पिळवणूक होत असल्याचा आरोप काळूच्या पत्नीने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT