Raigad Fire News Saam TV
महाराष्ट्र

Raigad Fire News: कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीने घेतला पेट; घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Fire News: सदर मालवाहू गाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक सुरू होती. आतमध्ये कच्चे तेल असल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

Ruchika Jadhav

सचिन कदम

Crude Oil Train:

रायगडमधून आगीची मोठी घटना समोर आली आहे. चौक रोड येथे एका माल गाडीने अचानक पेट घेतला आहे. पनवेल खालापूर दरम्यान चौक रोड रेल्वे स्थानका दरम्यान ही घटना घडलीये. सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीये.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सदर मालवाहू गाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक सुरू होती. आतमध्ये कच्चे तेल असल्याने आगीवर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

मात्र बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने त्यांना आग विझवण्यात यश आलं आहे. आग दुर्घटने दरम्यान रेल्वेची ओव्हर हेड वायर तुटली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मालवाहू गाडीतून कच्च्या तेलाची वाहतूक मुंबईहून मिरजला करण्यात येत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT