गटारी निमित्त चिकन, मटण दुकानावर गर्दी... राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

गटारी निमित्त चिकन, मटण दुकानावर गर्दी...

आज रविवारी जिल्ह्यात मटणासोबत रिचवले जाणार मद्याचे पेले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - श्रावण Shravan महिना सुरू होण्याआधी गटारी Gatari हा सण रायगडात Raigad मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. आज रविवार आणि गटारी अमावस्या जोडून येणं म्हणजे चिकन Chiken आणि मटण Mutton खवय्यांसाठी पर्वणीच. आज रविवार आला असल्याने गटारी जोरदार साजरी केली जाणार आहे. गटारी असल्याने मटण, चिकन तसेच मद्याच्या दुकानावर ग्राहकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मटण, चिकन व्यवसायिकांचा धंदाही आज तेजीत आहे.

हे देखील पहा -

आज रायगडात साधारण चार ते पाच हजार बोकड कापले गेले आहेत. मटणासोबत मद्यपीच्या रांगा ह्या वाइन शॉप वर पाहायला मिळत आहेत. गावागावात एकत्रित बोकड कापून नागरिकांनी आपले मटणाचे वाटे घरी नेले आहेत.

श्रावणात अनेक जण मांसाहार टाळत असतात. श्रावण सुरू होण्याआधी गटारी सण साजरा केला जातो. गटारी असल्याने मित्रमंडळी, नातेवाईक एकत्र येऊन गटारी साजरी करतात. मटणासोबत आज मद्याचे घोट रिचवले जाणार आहेत.

मटण, चिकन खरेदीसाठी पहाटे पासून ग्राहकाच्या रांगा दुकानाबाहेर लागलेल्या आहेत. रविवार असल्याने आजची गटारी अमावस्या जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. मटण, चिकन व्यवसायिकांनीही जास्तीचा माल आज भरलेला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळ्यात महिना भरापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली

Aavalyacha Juice: महिनाभर प्या आवळ्याचा ज्यूस, १५ दिवसांत दिसेल शरिरात बदल

Watch Video : दुचाकीस्वार तरूण पुरात अडकला; नवविवाहितेनं जीवाची पर्वा न करता वाचवला जीव, थरारक व्हिडिओ व्हायरल

Government Hospital: रुग्णाच्या अंगावरच कोसळला स्लॅब; अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्थेचा धक्कादायक प्रकार

Vadapav Recipe: घरी वडापाव बनवताना ‘या’ 5 टिप्स लक्षात ठेवा; दुकानात मिळतो तसा टेस्टी लागेल!

SCROLL FOR NEXT