Sindhudurg , crocodile saam tv
महाराष्ट्र

Crocodile : मगर फिरतेय रस्त्यावर; सिंधुदुर्गासह कराडात भीतीचं वातावरण

मगरीचा बंदोबस्त तातडीनं करा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- विनायक वंजारे

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी आरोंदा रस्त्यावर रात्री काही प्रवाशांना मगरीचे दर्शन झालं. ही मगर रस्त्याच्या कडेला सापाची शिकार करताना दिसली. त्याचा व्हिडीओ प्रवाशांनी त्यांच्या माेबाईलमध्ये (mobile) काढला. (sindhudurg latest marathi news)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीतील मगर चक्क रस्त्यावर येत काही काळ रस्त्यावर ठाण मांडून होती. ही मगर सुमारे पाच ते सहा फुटांची हाेती. तेरेखोल नदीतून मगर रस्त्यावर फिरू लागल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे.

या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकाने मगरीचा रस्त्यावर फिरणारा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. मगर चक्क रस्त्यावर येऊन शिकार करताना या व्हिडिओ मधून दिसत आहे. रस्त्यावर मगर दिसू लागल्यामुळे नागरिक तसेच वाहनचालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, मगरी अशा प्रकारे रस्त्यावर, शेतात फिरू लागल्याने वनविभागाने मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होऊ लागली आहे. (Breaking Marathi News)

crocodile on road near sindhudurg

कराड तालुक्यातही मगरीची भीती

कराड तालुक्यातील टेंभू गावात कृष्णा नदीच्या पात्रात मगरीचा वावर आहे. मगर अनेकदा नदी काठावर येऊन बसत असल्याचे आढळून येत आहे. परिसरातील शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी या परिसरात जावं लागत असल्याने भीतीचे वातावरण आहे. मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Fire : आधी धूर, नंतर आगीचा वेढा; घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग

Maharashtra Tourism: लोणावळा, खंडाळाही पडेल फिकं! नाशिकजवळ असलेलं 'हे' कमी गर्दीचं हिल स्टेशन तुम्हालाही पाडेल भूरळ

Home Wall Colour: वास्तुशास्त्रानुसार घराच्या भितींना कोणता रंग द्यावा?

Shivbhojan Thali: उद्धव ठाकरेंची 'शिवभोजन थाळी' योजना बंद पडणार? गैरव्यवहाराच्या तक्रारींमुळे केंद्र बंद करण्याचे आदेश|VIDEO

Rajgad To Pratapgad: राजगड ते प्रतापगड प्रवास कसा कराल? बस, रेल्वे आणि खासगी वाहन मार्ग

SCROLL FOR NEXT