Political News  Saam TV
महाराष्ट्र

Political News : चोरांना चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला?...; सामना अग्रलेखातून मोदींवर निशाणा

याच अमृतकाळात चोरांना चोर म्हटलं म्हणून शिक्षा ठोठावली गेली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Political News : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे . साल २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी टीका केली होती. या प्रकरणी त्यांना सुरतमधील सत्र न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली. यावर पुढे राहुल गांधी यांना जामीन देखील देण्यात आला. अशात काल (शुक्रवारी) राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणावर आता सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर टीका करण्यात आली आहे. (Rahul Gandhi Disqualified as mp)

चोरांना चोर म्हटलं! हा काय गुन्हा झाला? असं शीर्षक देत सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे की,'राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा भ्याडपणा मोदी सरकारने दाखवला आहे. चोरांना चोर म्हणण्याचे धाडस राहुल गांधी यांनी दाखवल्यामुळे सत्ताधाऱ्यांनी कायदेशीर कारवाईची मर्दुमकी दाखवली.'

‘मोदीनामा’ची मानहानी झाली...

अग्रलेखात राहुल गांधी यांनी विचारलेला प्रश्न लिहित पुढे म्हटले आहे की, 'सर्वच चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न राहुल गांधी यांनी कर्नाटकातल्या एका प्रचारसभेत विचारला होता. त्यामुळे ‘मोदीनामा’ची मानहानी झाली असे ठरवून गुजरातच्या एका वेगळ्याच मोदींनी सुरत न्यायालय गाठले. सुरतच्या न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माफी मागून प्रकरण मिटवा असा पर्याय राहुल गांधी यांना न्यायालयाने दिला होता. मात्र राहुल गांधींनी तसे न करता सुरत न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याचा पर्याय स्वीकारला.'

सत्य आणि ईश्वर अशा दोघांवर संकटांची तलवार

निकालानंतर राहुल गांधी यांनी आपलं मत व्यक्त करत म्हटलं की, सत्य हाच माझा इश्वर आहे.मात्र आजच्या युगात सत्य आणि ईश्वर अशा दोघांवर संकटांची तलवार लटकते आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा काळ अमृतकाल आहे असं म्हटलं होतं. मात्र याच अमृतकाळात चोरांना चोर म्हटलं म्हणून शिक्षा ठोठावली गेली, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर करण्यात आली आहे.

गौतम अदाणी व मोदी भाई-भाई, देश लुट कर खाई मलई

'चोरांना सजा मिळाली नाही. गौतम अदाणी व मोदी भाई-भाई, देश लुट कर खाई मलई अशा घोषणा संसदेत दणाणत आहेत. दोन आठवड्यांपासून संसद बंद पडली आहे. देश लुटणाऱ्या अदाणींवर कारवाईचे नाव नाही. पण चोरांना चोर म्हटले म्हणून राहुल गांधींवर न्यायालयाच्या खांद्यावरून सत्ताधारी पक्षाने गोळी झाडली आहे.याआधी बदनामीच्या प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा झाल्याचे उदाहरण आपल्या देशात नाही, मात्र राहुल गांधी बदनामीच्या या प्रकरणातील खटल्याल अपवाद ठरले आहेत.'

चोर असल्याचं राहुल गांधी म्हणाले पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले.

मोदी चोर आहेत असं राहुल गांधी म्हणाले होते, पण ते डरपोकही आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. अर्थात जी गोष्ट देशाला सांगण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च आला असता ती गोष्ट गुजरातमधील सुरत न्यायालयाने देशभरात फुकटात पोहचवली, अशी टीका मोदींवर करण्यात आली आहे.

'माध्यमांवर बंधने लावण्यात आली आहेत, पण सुरतच्या न्यायालयाने जणू काही ही बंधने हटवून मोदी खरे कोण आहेत? हेच देशाला दाखवले आहे. देशातला भ्रष्टाचार दडपण्यासाठी लोकशाही आणि न्याय यंत्रणेची केलेली ही मुस्कटदाबी असल्याचं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: लय अवघड हाय गड्या.. दोनदा बॅटिंगला येऊनही विराटला अवघ्या इतक्याच धावा करता आल्या

Diljit Dosanjh : दिलजीत दोसांजला पोलिसांची नोटीस; नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, सीसीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू

Bachchu Kadu : सरकार किसकी भी हो.. हुकूमत हमारी होती है; नेवासा येथील सभेत बच्चू कडू यांचे वक्तव्य

Ooty : बॉलिवूडच्या 'या' सुपर हॉरर चित्रपटाचे शूटिंग झालंय उटीमध्ये, हिवाळ्यात अनुभवाल धुक्याच्या टेकड्या

SCROLL FOR NEXT