Maharashtra Politics: काय सांगता! राष्ट्रवादीच्या बॅनरवर चक्क चंद्रकांत पाटील; इंदापूर शहरातील फ्लेक्सची सर्वत्र चर्चा

Pune News Update: कायम एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या या एकत्रित बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
Chandrakant Patil On NCP Banner
Chandrakant Patil On NCP BannerSaamtv

सचिन जाधव..

Indapur News: कसबा पोट निवडणूकीपासून पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) चांगलेच चर्चेत येत आहेत. कसबा पोट निवडणूकीत धक्कादायक रित्या पराभव स्विकारावा लागल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीकाही झाली होती. इतकेच नव्हेतर रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे थेट कोल्हापूरात बॅनर लावून चंद्रकांत पाटील यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता.

मात्र सध्या इंदापूर शहरात चंद्रकांत पाटील थेट राष्ट्रवादीच्या बॅनरवर झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. कायम एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या नेत्यांच्या या एकत्रित बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. (Latest Marathi News)

Chandrakant Patil On NCP Banner
PMC Budget 2023: पुणे मनपा अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा! PMPL साठी ४७० कोटींची तरतूद; ८ नवे उड्डाणपुल होणार

याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर शहरात राष्ट्रवादीच्या बॅनरवर चक्क भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत शरद पवार( Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule), आणि अजित पवार (Ajit Pawar) या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या सोबतीला पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा फोटो लावल्याचे दिसत आहे. वास्तविक इंदापूर शहराला विकास कामांसाठी निधी दिल्याने बॅनरवर चंद्रकांत पाटील यांचे फोटो लावत राष्ट्रवादीकडून आभार मानले आहेत.

Chandrakant Patil On NCP Banner
Rahul Gandhi: राहुल गांधींची खासदारकी का रद्द झाली? काँग्रेस नेत्यानेच नेमकं काय ते सांगितलं

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या प्रयत्नातून हा निधी आल्याचा उल्लेख करत बॅनरवर धन्यवाद चंद्रकांत दादा अशा आशयाचे बॅनर इंदापूरच्या चौकाचौकात लागले आहेत. या बॅनरची सध्या सोशल मीडियासह कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com