Crime : 150 किलो गांजाच्या तस्करीत पोलीस कर्मचाऱ्यास अटक!
Crime : 150 किलो गांजाच्या तस्करीत पोलीस कर्मचाऱ्यास अटक! SaamTvNews
महाराष्ट्र

Crime : 150 किलो गांजाच्या तस्करीत पोलीस कर्मचाऱ्यास अटक!

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : छत्तीसगड पोलिसांनी १५० किलो गांज्याच्या तस्करीचा डाव हाणून पाडला आहे. यात पोलिसांनी सहा आरोपींस अटक केली असून यातील एक आरोपी हा मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी आहे. हा गांजा (Cannabis) ओडिशा मार्गे मुंबईत तस्करी केला जाणार होता. छत्तीसगड (Chhattisgarh) मधील बस्तर पोलिसांना माहिती गुप्त बातमीदाराच्या मदतीने माहिती मिळाली होती की, महागाड्या गाड्यातून मोठ्या प्रमाणात मुंबईत (Mumbai) गांज्याची तस्करी केली जाणार आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून छत्तीसगड-ओडिशा राज्याच्या सीमेवर वाहनांची तपासणी सुरु केली आहे.

हे देखील पहा :

यावेळी पोलिसांनी ओडिशा (Odisha) मधून येणाऱ्या एका इनोव्हा गाडीला तपासणीसाठी थांबवले असता पोलिसांना यात ७० किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी अंकित जयस्वाल (२१ ) आणि चांद पाशा (२३) या दोन आरोपींना अटक केली आहे. सदरचे आरोपी हे महाराष्ट्रातील (Maharashtra) आहेत. तर याच्यापाठोपाठ येणाऱ्या दुसऱ्या एका गाडीला थांबवून तपासणी केली असता त्यात ८० किलो गांजा आढळून आला. यात पोलिसांनी अजय पटेल (२२), सूरज मौर्य (२२), रितेश सिंह (२२) आणि साजिद पठाण (३२) याला अटक केली. यांच्याकडून पोलिसांनी एकूण १५० किलो गांजा जप्त केला आहे. याची किंमत ७ लाख ५० असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी पैकी आरोपी साजिद पठाण हा मीरा भाईंदर पोलीस (police) आयुक्तालयातील पोलीस नाईक आहे. सध्या तो आयुक्तालयाच्या मुख्यालयात सेवेत आहे. यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त विजयकांत सागर यांनी त्यावर पोलीस खात्यांतर्गत कारवाई केली जाणार असून अजून आरोपी छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi Rally: शहजादेला पंतप्रधान बनवण्यासाठी पाकिस्तान उतावळा, पीएम मोदींचा राहुल गांधींवर पुन्हा निशाणा

Dubai Rain Alert : दुबईवर जलप्रलयाचं संकट! मुसळधार पावसाच्या शक्यतेने फ्लाईट्स रद्द, शाळा बंद

Today's Marathi News Live : अहमदनगर जिल्ह्यात खासगी बसला भीषण आग

Vangyach Bharit: झणझणीत! अस्सल गावरान वांग्याचं भरीत, खास रेसिपी

Oil Free Diabetes Thali : रक्तातील साखर १०० टक्के वाढणार नाही; घरीच बनवा ऑइल फ्री डायबिटीज थाळी

SCROLL FOR NEXT