Rajur Police Station  Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News : पत्नीला फिरायला नेलं अन् तिथेच संपवलं; सॅनिटरी पॅडने मामा-भाच्याला पोहोचवलं तुरुंगात, हत्येचं कारणंही आलं समोर

Akole Women Killing Case : महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या सॅनिटरी पॅडवर 'फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर' असे लिहिले होते.

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

Ahmednagar News : अहमदनगरच्या (Ahmednagar) अकोले तालुक्यातील दुर्गम भागात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटवण्यासोबतच तिची हत्या करणाऱ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. एका सॅनेटरी पॅडमुळे पोलिसांना हे शक्य झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मामा आणि भाच्याला अटक केली आहे.

राजूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कातळापूर परिसरात एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह काही दिवसापूर्वी पोलिसांना सापडला होता. अनोळखी महिलेचा खून झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून आलं होतं. महिलेची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. यावेळी पोलिसांना मृतदेहाजवळ मिळून आलेल्या पर्समध्ये सॅनिटरी पॅड आणि पायातील पैंजन आढळले.

महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या सॅनिटरी पॅडवर 'फॉर युज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर' असे लिहिले होते. पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. मृतदेह हा अकोले तालुक्यात सापडल्याने तेथील गावागावात महिलेच्या ओळखीसाठी पोलिसांनी एक मेसेज तयार करून सोशल माध्यमांवर व्हायरल केला. (Latest Marathi News)

मात्र तरी देखील ही महिला नेमकी कोण याचा शोध लागला नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक थेट अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेले. तेथील अधिकार्‍यांकडून या सॅनिटरी पॅडची माहिती घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्‍या आशा सेविका, अंगणवाडी ताई अशा काही ग्रुपवर पोलिसांनी मृत महिलेच्या फोटोसह मॅसेज पाठवले.

त्यानंतर राहुरी तालुक्यातील वांबोरी येथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निष्पन्न झाले. महिलेची ओळख पटताच पोलीस तपासला दिशा मिळाली आणि सखोल तपास सुरू झाला. (Breaking Marathi News)

कल्याणीचे लग्न वांबोरी येथे राहणाऱ्या महेश जाधव याच्याशी झाले होते. मात्र महेश हा कल्याणी हिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. त्यामुळे महेश याने आपला भाचा मयुर अशोक साळवे याला सोबत घेऊन पत्नी कल्याणीला अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात फिरायला घेऊन गेला.

कातळापुर परीसरात निर्जनस्थळी तिचा गळा आवळून खुन करुन मृतदेह तिथेच टाकून दोघेही मामा-भाचे पसार झाले. मात्र एका सॅनिटरी पॅडमुळे या खुनाला वाचा फुटली आणि पोलिसांनी आरोपी पती महेश जाधव तसेच त्याचा भाचा अशोक साळवेला बेड्या ठोकल्या असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

Shirdi Sai Sansthan: साई संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत खळबळ, कारण काय? VIDEO

Cancer Signs: ७ लक्षणं दिसल्यास ९० दिवसांत डॉक्टरांकडे जा, कॅन्सर मूळापासून नष्ट होणार, वाचा तज्ज्ञांनी काय सांगितलं

Samruddhi Expressway Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! दोन परदेशी नागरिकांचा जागीच मृत्यू|VIDEO

'बहिणीवर बलात्कार अन् आईला आयुष्य संपवण्यास प्रवृत्त', माजी मंत्र्यांवर बायकोचे खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT