Chhatrapati Sambhaji Nagar Crime News saam tv
महाराष्ट्र

Crime News : जीव वाचवला म्हणून पित्यानेच केली मुलीची हत्या; धक्कादायक घटनेनं जम्मू-काश्मीर हादरलं

धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे.

Saam TV News

Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरमधून एक भयावह घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. मुलीने आत्महत्या करण्यापासून रोखल्याने या व्यक्तीने मुलीची हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सध्या आरोपी पोलिसांच्या अटकेत आहे. (Crime News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे ही घटना घडली आहे. ५ दिवसांआधी येथे एका ८ वर्षीय चिमुकलीची हत्या झाली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी ताक्ताळ या प्रकरणाचा छडा लावला आहे. तपासात पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली आहे. मोहम्मद इक्बाल खतना असं आरोपी पित्याचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याच्या पत्नीची सतत भांडणे होत होती. सदर घटना घडली त्या दिवशी देखील या दोघांचे जोदरार भांडण झाले होते. त्यामुळे इक्बाल हातात एक चाकू घेऊन त्याच्याकडे असलेल्या कारमध्ये बसून निघून गेला.

आपल्या बाबांच्या हातात सुरा होता त्यामुळे ते आत्महत्या करतील या विचाराने ८ वर्षांची चिमुकली देखील त्या कारमध्ये बसली. काही वेळाने इक्बालने कार एका ठिकाणी थांबवली आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तितक्यात त्याच्या मुलीने त्याला अडवले. इक्बालने मुलीला समजावले आणि घरी जाण्यास सांगितले मात्र ती घरी जाण्यास तयार नव्हती.

त्यामुळे रागाच्याभरात त्याने आपल्या मुलीचा गळा आवळला. यातच तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर इक्बालने तिच्या गळ्यावर चाकूने वार करत मृतदेहाची विल्हेवाट लावली. त्यानंतर तो घरी निघून आला. घरी आल्यावर कुटुंबीयांनी मुलीबाबत विचारले असता आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर इक्बालने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि मुलगी हरवली असल्याची तक्रार केली.

इक्बाल पुन्हा घरी येईपर्यंत कुटुंबीयांना मुलीचा मृतदेह सापडला होता. मुलीची हत्या झाल्याचे समजताच पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. त्यानंतर ५ दिवसांनी वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज ठाकरे यांची 28 तारखेला कर्जतमध्ये सभा

Pune : पुण्यात खळबळ! रिसॉर्टवरील देहविक्रीचा पर्दाफाश; १००० रुपयांमध्ये महिलांकडून वेश्याव्यवसाय

Boiled egg storage: उकडलेली अंडी किती दिवस फ्रिजमध्ये सुरक्षित राहू शकतात?

Toilet Paper : टॉयलेट पेपरचा अतिवापर पडेल महागात, होऊ शकतात 'हे' ५ गंभीर आजार

Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

SCROLL FOR NEXT