Mumbai Crime News Saam TV
महाराष्ट्र

Mumbai Crime News: देवाला तरी सोडा रे...! गणेश मूर्तीची चोरी; काही तासांतच पोलिसांनी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

Andheri Theft News: येथे चक्क गणेश मूर्तीची चोरी करण्यात आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Andheri Crime News: मुंबईमधून चोरीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरी चोरी झाल्यावर व्यक्ती सहज म्हणतात देव त्याला त्याची शिक्षा देईल. मात्र अंधेरी अंधेरी पूर्वेकडील घाटकोपर लिंक रोड परिसराती संतोषी माता मंदिरातच चोरी झाली आहे. येथे चक्क गणेश मूर्तीची चोरी करण्यात आली आहे. (Ganesha idol stolen)

या घटनेमुळे अंधेरी पूर्व परिसरात खळबळ उडालीये. मात्र चोरीचा (Theft) गुन्हा दाखल होताच अवघ्या 48 तासात अंधेरी पोलिसांनी दिवस-रात्र एक करून चोराच्या मुसक्या आवळल्यात. तब्बल 120 सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी आरोपीचा माग काढून त्यास अटक केली. संतोष अंकुश भोईर उर्फ खजवा (२९ वर्ष) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंधेरी (Andheri) पूर्वेकडील संयुक्त अपार्टमेंट जवळ शरद सिंग कॉलनी परिसरातील संतोषी माता मंदिरातील श्री गणेश मूर्ती अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याबाबतची तक्रार मंदिरांच्या ट्रस्टीकडून अंधेरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्याप्रमाणे फिर्यादी यांचा सविस्तर जबाब नोंद करून तात्काळ कलम ४५४,३८०,४११ भांदवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ नि.अमित यादव आणि किशोर परकाळे व दोन्ही पथकातील गुन्हे प्रकटीकरण अमलदार यांनी तपास सुरू केला. घटनेची वेळ रात्रीची असल्याने आरोपीची ओळख पटवणे काहीसे अवघड झाले.त्यामुळे सलग 48 तास दिवस-रात्र दोन्ही पथकातील अधिकारी अमलदारांनी खाजगी व सरकारी असे एकूण १००-१२० कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज चेक करून संशयित इसम पांढऱ्या रंगाच्य बॅग मधे काहीतरी जड वस्तू घेऊन जात असल्याचे दिसून आले.

फुटेजमधील अस्पष्ट फोटो सर्व खात्रीलयक गुप्त बातमीदारास पाठवून त्याची ओळख पटवली. ओळख पटलेला हा सराईत गुन्हेगार संतोष अंकुश भोईर उर्फ खजवा असल्याचे समजले. त्यानंतर आरोपीला नालासोपारा आणि मरोळ या दोन्ही पत्त्यांवर शोधण्याचा प्रयत्न केला असता तो आढळून आला नाही.

आरोपी संतोष उर्फ खजवा हा बीएमसी (BMC) कचरापेटी जे बी नगर येथे (1 जून) या दिवशी येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदाराकडून मिळाली. यानुसार परिसरात सापळा रचून त्यास ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून गुन्ह्याच्या अनुषंगाने केलेल्या कौशल्यपूर्वक चौकशीत त्याचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपीने चोरी केलेली मूर्ती ही एका महिलेस विकली असल्याचे सांगितले त्याप्रमाणे पुगावानंम सुभ्रमणि या महिलेस ताब्यात घेऊन मूर्ती हस्तगत करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Health tips: दालचिनीचे पाणी प्यायल्यास होतील 'हे' जबरदस्त फायदे

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

SCROLL FOR NEXT