Kolhapur Crime Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Crime: कळंबा कारागृहात कैद्यात हाणामारी, वृद्ध कैदी जखमी

जिल्हा मध्यवर्ती कळंबा कारागृहामध्ये किरकोळ कारणांवरून २ कैद्यांच्यात झालेल्या हाणामारीत वृद्ध कैदी जखमी झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर: जिल्हा मध्यवर्ती कळंबा (Kalamba) कारागृहामध्ये किरकोळ कारणांवरून २ कैद्यांच्यात (prisoners) झालेल्या हाणामारीत (Fighting) वृद्ध कैदी जखमी झाला आहे. सुरेश कचरू वैती (वय- ७०) असे जखमी कैद्याचे नाव आहे, तो जन्मठेपेची सध्या शिक्षा भोगत आहे. पोलिसांनी (police) दिलेल्या माहितीनुसार की, कळंबा कारागृहामध्ये (Prison) २ दिवसाअगोदर कैदी टीव्ही पहात बसले होते. (Crime Inmate fights Kalamba Kolhapur Prison)

हे देखील पहा-

त्यावेळेस आवडीनुसार चॅनेल बदलण्यावरून कैद्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाली होती. त्याचा राग मनात धरून खुनाच्या गुन्ह्यात संशयित कैदी दस्तगीर गफूर शहा याच्या सांगण्यावरून बैतुल अब्दुल शेख हा कैदी सर्कल नंबर ६ जवळ गेला होता. त्याने मातीत पडलेला काचेचा तुकडा घेऊन वयस्कर असलेला कैदी सुरेश वैती याच्यावर हल्ला केला आहे.

या हल्ल्यामध्ये (attack) हाताला काच लागल्यामुळे सुरेश वैती हा कैदी जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या वादावादी प्रकरणी कारागृहात प्रकाश शिवाजीराव लोमटे या सुरक्षा अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. त्यानुसार जुना राजवाडा पोलीस (police) ठाण्यात बैतुल शेख सनी दस्तगीर शहा या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT