Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून...  Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Crime: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून...

दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावमध्ये राहत्या घरी चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगावमध्ये राहत्या घरी चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केला आहे. सिद्धू हराळे असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव असून, त्याने पत्नी मनीषाच्या डोक्यात पाईप घालून खून केला आहे. आश्चऱ्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः सिद्धू हराळेने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती देत खून केल्याची कबुली दिली आहे.

हे देखील पहा-

या प्रकरणी पतीला मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, २००४ साली सिद्धू आणि मनीषा यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या 17 वर्षात सर्व अगदी व्यवस्थित सुरु होत. या दोघांना २ मुली आणि १ मुलगा ही आहे. दोघे गुंजेवाडीतील स्वतःच्या शेतामध्ये शेती करायचे. मात्र, मागच्या २ महिन्यांपासून मनीषा ही दुसऱ्याच्या शेतात कामाला जातं होती.

तेंव्हापासून पतीने चरित्र्यावर संशय घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्याच संशययावरुन शेवटी पत्नीचा खून केला आहे. या घटनेमुळे मोहोळ तालुका आणि परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जातं आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

Paasport Fees : पासपोर्ट काढणं महागलं! केंद्र सरकारनं वाढवली फी, आता किती रुपये मोजावे लागणार?

Ketan Agarwal Case: चार चुका अन् केतनच्या हत्येचा उलगडा; नोकर ठरणार साक्षीदार, सिया-चेतनला फाशी होणार?

SCROLL FOR NEXT