नागपंचमी निमित्त नागाला खेळवणाऱ्यावर गुन्हा दाखल File Photo
महाराष्ट्र

नागपंचमी निमित्त नागाला खेळवणाऱ्यावर गुन्हा दाखल

सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कापरी येथील कडवेकर मळा दत्तनगर येथे नागाला खेळवल्या प्रकरणी ४६ वर्षीय इसमावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : सांगलीच्या शिराळा तालुक्यातील कापरी येथील कडवेकर मळा दत्तनगर येथे नागाला खेळवल्या प्रकरणी ४६ वर्षीय इसमावर वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. तर, नागास वन विभागाने नैसर्गिकआदिवासात सोडले आहे.

हे देखील पहा -

सांगली वनविभाग अंतर्गत शिराळा वनपरिक्षेत्रातील शिराळा येथील नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस आणि वनविभाग यांचा बंदोबस्त ठेवला होता. या बंदोबस्ता दरम्यान पथक फिरत असताना दत्तनगर कडवेकर मळा कापरी येथे इसमाला नाग हाताळत असताना ताब्यात घेतले.

त्याच्या विरोधात वन्यजीव संरक्षक नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून हस्तगत केलेला एक नाग जप्त करून त्यास नैसर्गिक आदिवासात मुक्त केले आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी हे करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apurva Gore: अपूर्वा गोरेचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहा

Maharashtra News Live Updates: संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात

Nashik News : नाशिकमध्ये मविआमध्ये बिघाडीची शक्यता; काँग्रेसने घेतला मोठा निर्णय

VIDEO : कुठे ५ कोटी, तर कुठे १.५ कोटी; राज्यात विधानसभा निवडणुकीत पैशांचा अक्षरश: पाऊस !

Health Benefits Of Bananas: डाएट मध्ये केळी खाण्याचे 'हे' आहेत आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT