sealed 
महाराष्ट्र

मास्क न घातलेल्या ग्राहकांना पेट्राेल दिले; २ पंप सील

सर्व गाेष्टींची पडताळणी झाल्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने दोन्ही पेट्रोल पंप सील केले.

राजेश काटकर

परभणी latest news : विना मास्क येणा-या ग्राहकांना तसेच लसीकरण न झालेल्यांना पेट्राेल (Petrol) दिल्याने जिल्हा पूरवठा शाखेने दाेन पेट्राेल पंप सील केले आहेत. या दाेन्ही पंपधारकांनी परभणी जिल्हाधिका-यांच्या आदेशाचा भंग केल्याने ही कारवाई केल्याची माहिती पूरवठा शाखेच्या पथकातील अधिका-यांनी दिली.

परभणी जिल्ह्यात लसीकरण झाले असेल तरच ग्राहकांना इंधन द्यावे असा आदेश नुकताच जिल्हाधिकारी आंचल गोयल anchal goyal यांनी काढला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्या नंतर पाथरी रस्त्यावरील नायरा एनर्जी लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड कंपनी या दाेन पंपावर जिल्हा प्रशासनाच्या पूरवठा विभागाने लक्ष ठेवले.

या दोन्ही पंपावर ग्राहकांनी काेराेना प्रतिबंधक लस घेतली की नाही याची खात्री केली जात नव्हती. तसेच मास्क न घातलेल्या नागरिकांना पेट्रोल डिझेलचा पूरवठा केला जात हाेता. याबराेबरच पेट्रोल पंपावर नोंदवही नसणे, ग्राहकांना निदर्शनास येईल असा काेविड नियमांचा फलक न लावणे या सर्व गाेष्टींची पडताळणी झाल्यानंतर पुरवठा विभागाच्या पथकाने दोन्ही पेट्रोल पंप सील केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Tips: वजन कमी करायचंय? मग आजपासून सोडा 'या' ७ सवयी, न्यूट्रिशनिस्टने सांगितले वेट लॉसचे नियम

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

SCROLL FOR NEXT