Corona Update News Saam tv
महाराष्ट्र

Maharashra Corona Update: राज्यात पुढील १५ दिवस महत्वाचे ; कोविड १९ टास्क फोर्सच्या बैठकीत काय ठरलं?

Maharashtra corona task force : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने टास्क फोर्सने आज महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्सकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Vishal Gangurde

maharashtra covid task force meeting:

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांचे निदान होऊ लागल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने टास्क फोर्सने आज महत्वाची बैठक बोलावली. या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी टास्क फोर्सकडून महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सने बैठक आयोजित केली. या बैठकीत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट आणि त्याचे संसर्ग रोखण्यावर बैठक झाली. तसेच या बैठकीत कोरोनाला रोखण्यासाठी १५ दिवस महत्वाचे आहेत, हे अधोरेखीत करण्यात आलं.

या बैठकीत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घेण्याची काळजी, ILI/SARI रुग्णांची तपासणी, क्लिनिकल प्रोटोकल तयार करणे, अफवांना अटकाव करणे या बाबींवर चर्चा करण्यात आली.

राज्यात नव्या १४६ कोरोना रुग्णांची

देशासहित राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १४६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज कोरोना जेएन. १ चा एकही रुग्ण आढळला नाही. त्यामुळे राज्यात जेएन.१ कोरोनाचे ११० सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT