Wardha, Court, Minor Girl saam tv
महाराष्ट्र

Court : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने युवकाला सुनावली तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा

यात शासनातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Wardha : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. रितीक विश्वेश्वर तुमडाम (वय २२) (राहणार बोरखेडी, ता. आर्वी) असे शिक्षा ठाेठावलेल्या युवकाचे नाव आहे. अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्हि. टि. सूर्यवंशी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. (wardha latest marathi news)

याबाबत अधिक माहिती अशी : ऑगस्ट २०१९ ला पीडित कॉलेज संपल्यानंतर वर्धा येथून बसने तिच्या गावी येत होती. यावेळी रितीक तिच्या बाजुला बसला होता. यावेळी त्याने पीडितेचा विनयभंग केला. शिवाय या प्रकाराबाबत पीडितेच्या भावाने त्याला हटकले असता त्याला मारण्यास धावला. त्यामुळे पीडिता व तिचा भाऊ घाबरून बस (bus) मधुन मध्येच येळावेळी येथे उतरले.

दुसऱ्या दिवशी पीडिता व तिचा भाऊ हे वर्धा बस स्थानकावर आले असता रितीक हा दारूच्या नशेत होता. त्याने पीडिताच्या भावाला मारण्यासाठी त्याच्या मित्राला बोलावले. या घडलेल्या प्रकारामुळे पीडिता घाबरली व तिने बस स्थानकावर पोलिसांना (police) बोलाविले. त्यांना घटना सांगितली व वर्धा पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. (Maharashtra News)

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन घोंगडे यांनी केला. पुराव्याअंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यात सरकार तर्फे विशेष सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी युक्तीवाद केला. यात शासनातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तोलून मापून आणि कोणत्याही घटकाला नाराज न करता काम करणे गरजेचे, अजित पवारांचा सल्ला

Trendy Blouse Design: सणासाठी साडी नेसायची असेल तर, असे ब्लाउज आत्ताच तयार करा

Diwali 2025: नरक चतुर्दशीला कारिट फळ का फोडतात? कारणे आहे खास

Liver Detox: लिव्हर डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय, आरोग्य सुधारेल

Gulgule Recipe: नाश्त्याला काय करायचं सूचत नाही? ही गोड गुलगुल्यांची झटपट रेसिपी ट्राय करा

SCROLL FOR NEXT