Bhandara News, Court saam tv
महाराष्ट्र

Life Imprisonment : पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला आजन्म कारावास, वाचा नेमकं काय घडलं हाेतं आठवडी बाजारपेठेत

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Bhandara News : 'माझ्यासोबत नांदायला चल, असे पत्नीला विचारल्यानंतर पत्नीने जाण्यास नकार दिल्याने पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केले. यात ती जागीच ठार झाली. याप्रकरणी भंडारा जिल्हा व सत्र न्यायालयाने पतीला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. शिशुपाल मंगलदास बर्वे (४१, रा. पिपरा) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना तुमसर तालुक्याच्या पिपरा येथे दि. १८ मार्च २०२१ रोजी घडली होती. (Maharashtra News)

प्राप्त माहितीनुसार, तुमसर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी असलेल्या शालू हिचा लग्न शिशुपाल बर्वे (रा. पिपरा) याच्यासोबत सन २००६ मध्ये झाले होते. दोन वर्षे पतीसोबत राहिली. त्यांना दोन अपत्य आहेत.

शिशुपाल हा दारू पिण्याच्या सवयीचा होता. याच कारणावरून शालू व शिशुपालमध्ये नेहमी भांडण व्हायचे. याकारणाने शालू व शिशुपाल हे शालूच्या आईकडे आष्टी येथे राहण्यात आले. येथेही शिशुपाल कुठलाही कामधंदा करीत नव्हता. दारूचे व्यसन सुरूच होते. याच कारणावरून शालूच्या आईने जावयाला तिथून हाकलले. त्याच्याविरुद्ध भादंवीच्या ३०२, ३२४ कलमान्वये गुन्हा दाखल करून जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी साक्ष व पुराव्यांच्या आधारे शिशुपाल मंगलदास बर्वे याला खुनाच्या प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच ३५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागणार आहे.

सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता दुर्गा तलमले, विनोद भोले यांनी बाजू मांडली. तसेच पोलिस अधीक्षक मोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, एसडीपीओ रश्मिता राव, पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस शिपाई तिलक दिघोरे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

अशी घडली होती घटना

१८ मार्च २०२१ रोजी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास शिशुपाल हा आठवडी बाजारात पोहोचला. भाजीपाल्याची दुकान बंद करीत असतानाच शिशुपाल हा कु-हाड घेऊन तिथे आला. तसेच शालू हिला तू माझ्यासोबत राहायला चल' असे बोलला. यावर शालूने जाण्यास नकार दिल्याने शिशुपालने कु-हाडीने शालूवर डोक्यावर, मानेवर वार केला. यात शालूचा जागीच मृत्यू झाला.

मुलीला वाचण्यासाठी गेलेल्या तिच्या आईवरही शिशुपालने प्रहार केला. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळ गाठून तपासाला प्रारंभ केला. तसेच शिशुपालला अटक करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Shahajibapu Patil : उद्धव ठाकरे कधीच मुख्यमंत्री होणार नाहीत; काळ्या दगडावरची पांढरी रेघ, ५० खोक्यांवरून शहाजीबापू खवळले

Mrunal Thakur: मृणाल ठाकूरविषयी माहित नसलेल्या गोष्टी

Navratri Special Dish: नवरात्रीसाठी रोज काय बनवायचं हा प्रश्न पडलाय का?

SCROLL FOR NEXT