सायबर गुन्हेगारांचे धाडस वाढले; चक्क पोलीस आयुक्तांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट संजय डाफ
महाराष्ट्र

सायबर गुन्हेगारांचे धाडस वाढले; चक्क पोलीस आयुक्तांच्या नावाने फेक फेसबुक अकाउंट

सायबर गुन्हेगाराने थेट पोलीस आयुक्तांना टार्गेट केल्यामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

संजय डाफ साम टीव्ही नागपूर

नागपूर - सायबर गुन्हेगारांची Cyber Crime मजल आता खूप दूर पर्यंत गेली आहे. आता सायबर गुन्हेगारांनी चक्क नागपूर पोलीस Nagpur Police विभागाचे प्रमुख पोलीस आयुक्तांच्या नावाने एक फेक फेसबुक अकाऊंट Fake Facebook Account तयार करून पैशाची मागणी केली आहे. सायबर गुन्हेगाराने थेट पोलीस आयुक्तांना टार्गेट केल्यामुळे पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे शहर उपाध्यक्ष रूपेश पन्नासे Rupesh Panase यांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार Amitesh Kumar यांच्या नावाने फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट Friend Request आली आणि त्यांनी ती रिक्वेस्ट स्विकारली. दुसऱ्या दिवशी त्यांना पोलीस आयुक्तांच्या फेसबुकवरून मॅसेज आला. हॅलो कसे आहात? त्यानंतर दुसऱ्या मॅसेजमध्ये थेट एक मदत हवी आहे करू शकणार का ? अशी विचारणा केली. त्यावर रुपेश यांनी उत्तर देताच पैश्यांची मागणी केली.

हे देखील पहा -

त्यामुळे रूपेशला थोडा संशय आला. त्यांनी लगेच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन केला आणि त्यांच्या नवे एक फेक फेसबुक अकाऊंट तयार झाल्याची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी प्रकरणाला गांभीर्याने घेत सायबर गुन्हे शाखेला याबाबत चौकशीचे आदेश दिले.

गेल्या काही महिन्यांपासून सायबर गुन्हेगार मोठमोठ्या व्यक्तीच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट तयार करून त्यावरून पैशाची मागणी करीत आहेत. अनेक मित्र, मैत्रिण आणि नातेवाईक चौकशी न करता पैसे त्यांच्या अकाऊंटला ट्रान्सफर करतात आणि त्यानंतर सायबर गुन्हेगारांनी गंडविल्याचा प्रकार लक्षात येतो. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.

अशा गुन्हेगारांवर सायबर विभागाचे लक्ष असून योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी डीसीपी गजानन राजमाने यांना फोन करून संपूर्ण माहिती दिली आहे. या अकाऊंटवरून आणखी काही जणांना फ्रेंड रिक्वेस्ट गेल्या असून भविष्यात पैशाची मागणी होऊ शकते. त्यामुळे हे फेक अकाऊंट ब्लॉक करावे.

माझ्या नावाने कुणीतरी फेक फेसबुक अकाऊंट तयार केले असून त्यावरू वेगवेगळे मॅसेज पाठविण्यात येत आहे. या फेसबुक अकाऊंटवरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्विकारू नये. त्यावरून कुणी पैशाची किंवा आणखी कशाची मागणी केल्यास देऊ नये. नागरिकांना अशा फेक अकाऊंट पासून सतर्क राहावे. या अकाऊंटबाबत साबयर विभागाला चौकशी करण्यास सांगितले आहे असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT