औरंगाबादेत कपलचा चालत्या दुचाकीवर 'किसिंग स्टंट'; व्हिडिओ व्हायरल  Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादेत कपलचा चालत्या दुचाकीवर 'किसिंग स्टंट'; व्हिडिओ व्हायरल

हा स्टंट म्हणजे अपघाताला निमंत्रणच

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

औरंगाबाद: मोठी वर्दळ असलेल्या जालना रोडवर एका कपलचा दुचाकीवर बसून किसिंग स्टंट केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, हे स्पष्ट झालेले नाही. या व्हिडिओमध्ये एका दुचाकीवर बसून तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करताना दिसून येत आहे.

हे देखील पहा -

दुचाकीवर तरुणीला समोर बसवून घेऊन हे कपल रोडवर अश्लील चाळे करत असल्याचे या दिसत आहे . अवस्थेत दुचाकीही चालविली जात होती. रस्त्याने ये- जा करणारे अन्य वाहनचालक हा प्रकार पाहून खजील होत असल्याचे दिसून आले.

मोठी वर्दळ असलेल्या या मुख्य रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु असते. यात बाईकवरील हे कपल दुचाकीवर स्टंट करत असल्याचे दिसत आहे. यामुळे ते त्यांच्यासोबतच इतरांचा जीव देखील धोक्यात टाकत होते. हा स्टंट म्हणजे अपघाताला निमंत्रणच असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : ठाकरे बंधूंच्या युतीत नवा ट्विस्ट? राज ठाकरेंकडून युतीबाबत सावध भूमिका, VIDEO

Weekly Horoscope: काहींना कामात यश मिळेल तर काहींना प्रवास जपून करावा लागेल, पाहा साप्ताहिक राशीभविष्य

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

SCROLL FOR NEXT