महापालिका निवडणुकीत उमेदवारी डावलल्याने भाजप कार्यकर्ते संतप्त
छत्रपती संभाजीनगरमध्ये निष्ठावंतांचा तीव्र उद्रेक
भाजप खासदार भागवत कराड यांच्या गाडीला काळं फासलं
हा उद्रेक आहे छत्रपती संभाजीनगरमधील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा. वर्षानुवर्षे पक्षाचं काम केलं. मात्र उपऱ्यांनाच उमेदवारी दिल्यानं कार्यकर्त्यानं थेट भाजप खासदार भागवत कराडांच्या गाडीला काळं फासलंय. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी अतुल सावे आणि भागवत कराडांविरोधात घोषणाबाजी करुन परिसर दणाणून सोडलाय.
शेवटपर्यंत आशेवर ठेवत अखेरच्या क्षणी धोका दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. एवढंच नाही तर एका कार्यकर्त्यानं अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. दुसरीकडे जातीचं राजकारण करत भाजपनं तिकीट कापल्याचाही आरोप कार्यकर्त्यानं केलाय.
हे कार्यकर्त्यांचं आंदोलन एवढ्यावरच थांबलं नाही. तर उमेदवारी न मिळालेल्या नाराज महिलांनी थेट उपोषणाचं अस्त्र उगारलंय. त्यामुळे भाजप नेत्यांची चांगलीच धावाधाव झाली. उपोषण करणाऱ्या इच्छूक महिलांनी तर थेट आमदार संजय केणेकरांनाच सुनावलंय. संभाजीनगरमधील भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक वाढत चालल्यानं भाजप नेत्यांनी थेट शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिलाय.
खरंतर कार्यकर्ता हा कोणत्याही पक्षाचा पाया असतो. मात्र आता याच पायावर घाव घालण्यात येतोय. निष्ठावंतांना डावलून उपऱ्यांना संधी दिली जातेय. त्यामुळे जे पेराल ते उगवेल या म्हणीप्रमाणे निष्ठावंतांना डावलून कार्यकर्त्यांच्या भावनांशी खेळ करणं कोणत्याच पक्षाला परवडणारं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनधरणीत अपयश आल्यास भाजपसमोर शिंदेसेना, ठाकरेसेना आणि महाविकास आघाडीसह स्वपक्षाच्याच कार्यकर्त्यांचं मोठं आव्हान असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.