Coronavirus new subvariant found in maharashtra goa karnataka record of 21 cases in india google
महाराष्ट्र

Coroana New Variant: कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची 3 राज्यात एन्ट्री; देशभरात आतापर्यंत 'इतक्या' रुग्णांची नोंद

Coroana New Varriant News: कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३ राज्यात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत.

Satish Daud

Coroana New Varriant in Maharashtra

कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट ‘जेएन.१’ ने देशभरात हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ३ राज्यात या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. कर्नाटक आणि गोव्यानंतर आता महाराष्ट्रातही ‘जेएन.१’ व्हायरसने शिरकाव केला असून सिंधुदुर्गातील ४१ वर्षीय व्यक्तीला संसर्ग झाला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्यास सांगितलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

‘जेएन.१’ व्हेरिएंट गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगाने पसरणाऱ्या व्हायरसपैकी एक बनला आहे. चिंताजनक बाब म्हणजे, या सब व्हेरिएंटचे सर्वाधिक रुग्ण गोव्यात सापडले आहेत. देशभरात या व्हेरिएंटची संख्या २१ वर पोहचल्याने चिंतेत वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-१ चा पहिला रुग्ण ८ डिसेंबर रोजी आढळला होता. केरळमधील एका व्यक्तीला या व्हेरिएंटची लागण झाली होती. त्यानंतर एकाच दिवसांत ३ जणांचा मृत्यू झाल्याने सरकार अलर्टवर आले.

दुसरीकडे केरळपाठोपाठ महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये देखील या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वनचा नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे.

१९ वर्षीय तरुणीला नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याने तिच्यावर कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. येथील एका ४१ वर्षीय पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

Crime : मैत्रिणीला भेटून घरी जात होती, नराधमांनी कारमध्ये ओढलं; १६ वर्षीय मुलीवर धावत्या कारमध्ये लैंगिक अत्याचार

Mahashtra Politics : महायुतीत नाराजीनाट्य; माधुरी मिसाळांच्या बैठकीवर शिरसाटांची नाराजी, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT