Beed Corona Update Saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri Corona Update : रत्नागिरीत कोरोनाच्या नव्या Jn.1 व्हेरिएंटचा शिरकाव? संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Corona JN.1 Variant Update : कोरोनाच्या नव्या जेएन.1 व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभाग देखील अलर्ट मोडवर आहे. दरम्यान काल नाशिकमध्ये देखील नव्या व्हेरिएंटचा संशयित रुग्ण आढळला होता.

अमोल कलये

Ratnagiri News :

कोरोना व्हायरसने राज्यात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. राज्यात अनेक कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. कोरोनच्या नव्या व्हेरिएंट JN.1ने देखील नागरिकांची आणि प्रशासनाची चिंता वाढवली आहे. पुणे, ठाणे, नाशिकमध्ये नव्या JN.1 व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीतही कोरोनाने दोन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रत्नागिरीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. दोन्ही रुग्णांची जिल्हा शासकीय रुग्णालयात चाचणी करण्यात आली आहे. रुग्णांच्या चाचणीचे नमुने तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आले आहेत. याचे रिपोर्ट आल्यांतर दोन्ही रुग्णांना नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे की नाही याबाबत स्पष्टता येईल. (Latest Marathi News)

राज्यातून कोरोना हद्दपार झाला असताना आता नव्या व्हेरिएंटमुळे आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून केलं जात आहे.

नाशिकमध्येही नव्या व्हेरिएंटचा संशयित रुग्ण

कोरोनाच्या नव्या जेएन.1 व्हेरिएंटच्या वाढत्या रुग्णांमुळे आरोग्य विभाग देखील अलर्ट मोडवर आहे. दरम्यान काल नाशिकमध्ये देखील नव्या व्हेरिएंटचा संशयित रुग्ण आढळला होता. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका महिलेला त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या महिलेला जेएन.१ व्हेरिएंटची प्राथामिक लक्षणे असल्याचा संशय डॉक्टरांना आहे.

देशात कोरोनाच्या नवीन जेएन.१ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर या व्हेरिएंटची महाराष्ट्रातील कोकणात एन्ट्री झाली. त्यानंतर ठाणे आणि पुणे शहरात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात मधुमेहावर 'ही' फळे, भाज्या गुणकारी

Rupali ganguli : अनुपमाच्या सेटवर दुर्घटना, एका व्यक्तीचा मृत्यू, रुपाली गांगुलीला गंभीर दुखापत

Maharashtra News Live Updates: सोलापूरमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या बॅगची तपासणी

Business Idea: पैशांसाठी सरकारी मदत घेऊन तुम्ही सुरु करू शकता 'हा' बिझनेस; दर महिना होईल तगडी कमाई

VIDEO : शरद पवारांना परळीत जातीपातीचं राजकारण करायचंय, धनंजय मुंडेंचा नाव न घेता घणाघात

SCROLL FOR NEXT