Corona New Variant Saam Tv
महाराष्ट्र

Corona New Variant : कोरोनाचा नवा व्हेरियंट महाराष्ट्रात, त्याची लक्षणे कोणती ? 'हा' अधिक घातक आहे का ?

गेल्या अडीच वर्षापासून संपूर्ण जग महामारी विरुद्ध लढा देत असताना मात्र अजूनही हे संकट कायम आहे.

कोमल दामुद्रे

Corona New Variant : कोरोनाचे (Corona) सावट कमी झाल्यानंतर ऐनी दिवाळीच्या वेळी पुन्हा त्याच्या नव्या व्हेरियंटने डोके वर काढले आहे. यामध्ये कोरोनाचा BA.5.1.7 आणि BF.7 याचा समावेश आहे.

याच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे प्रशासन व नागरिकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अडीच वर्षापासून संपूर्ण जग महामारी विरुद्ध लढा देत असताना मात्र अजूनही हे संकट कायम आहे. त्यातच कोरोनाचा नवीन विषाणूचे काही उपप्रकार आढळले आहे. (Latest Marathi News)

परिस्थिती अधिक चिंता जनक

हा विषाणू अधिक घातक नसला तरी त्याची पसरण्याची क्षमता जास्त आहे. नुकत्याच सापडलेल्या BA.5.1.7 आणि BF.7 हे उपप्रकारांमध्ये झपाट्याने पसरण्याची क्षमता असून दिवाळीपर्यंत कोरोनाची नवी लाट येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

ओमिक्रॉन BF.7 हा चीनच्या उत्तर-पश्चिम मंगोलियामध्ये आढळून आला. त्याला ओमिक्रॉन स्पॉन असेही म्हटले जात आहे. (Corona New Variant)

गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरने शोधल्याप्रमाणे BF.7 चे पहिले प्रकरण भारतात आढळून आले आहे. तर दुसरीकडे पुण्यातही कोरोनाच्या BQ.1 नव्या व्हेरियंटने एन्ट्री केली आहे.

गेल्या दोन आठवड्यांत युनायटेड स्टेट्समध्ये या प्रकाराचा प्रसार दुप्पट झाला आहे (0.8 ते 1.7% पर्यंत). यूके, जर्मनी आणि फ्रान्स सारख्या युरोपियन देशांमध्ये या प्रकारांपैकी जवळजवळ 15-25% प्रकरणे आहेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.

BA.5.1.7 आणि BF.76 ची लक्षणे (Symptoms)

  • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की या प्रकारांची लक्षणे कमी-अधिक प्रमाणात समान असतील परंतु कालांतराने अधिक दिसून येतील.

  • याची लक्षणे ही सामान्यत: पूर्वीसारखीच असतात, शरीरात दुखणे हे प्रामुख्याने असते.

  • जर तुम्हाला घसा खवखवणे, रक्तसंचय, थकवा, खोकला आणि नाक वाहणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील, वेळ न दवडता तपासणी करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट पालक पनीर पराठा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात बीटीबी भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

SCROLL FOR NEXT