Covid file photo  Saam Tv
महाराष्ट्र

Corona Update: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली; अशी आहे आजची कोरोनाबाधितांची ताजी आकडेवारी

राज्यात नागरिकांना कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : राज्यात नागरिकांना कोरोनाचा धोका अद्याप कायम आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने राज्यातील नागरिकांची चिंता वाढली आहे. सोमवारी राज्यात १,८८५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात दिवसभरात एका रुग्णाचा कोरोनाने (Covid 19) मृत्यू झाला आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने (Health Department) दिली आहे. ( Maharashtra Corona Update News In Marathi )

राज्यात आतापर्यंत एकूण १७, ४८० इतकी सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १,४७, ८७१ झाली आहे. तर आज राज्यात ७७४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्तांची ७७,४७,१११ इतकी संख्या झाली आहे. राज्यात कोरोनाने बरे होणाऱ्यांचा दर ९७.९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर राज्यात मृत्यू दर १.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी चौथ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भाष्य केलं आहे. राजेश टोपे म्हणाले, 'तसेच ज्या ज्या ठिकाणी रुग्ण संख्या वाढत आहेत, अशा ठिकाणी डोस वाढवण्यात येणार आहे. तसेच बुस्टर डोससाठी हर घर दस्तक ही योजना राबविली जाणार आहे. त्याचबरोबर ही रोजना राबवत असताना आशा वर्कर यांना दोन हजार रुपये मानधन दिले पाहिजे, अशी मागणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे'.

पुण्याबद्दल सांगताना टोपे म्हणाले, पुण्यातील (Pune) वाढत्या म्युकरमायक्रोसेसच्या (Mucormycosis) रुग्णाबाबत राज्य सरकारने गांभीर्याने घेतले आहे. म्युकरमायक्रोसेसवर उपचार करणे महाग आहे. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक प्रस्ताव आरोग्य विभागाच्या वतीन देण्यात येणार आहे'. या प्रस्तावातून रुग्णांना आर्थिक आधार देता येईल का ? याचा विचार सुरु असल्याचे टोपेंनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Damage Causes: दारू न पिताही लिव्हर खराब करतात 'या' सवयी; वेळीच व्हा सावध

Nilesh Ghaywal: निलेश घायवळचं लंडन पलायन, पासपोर्ट प्रकरणावर चंद्रकांत पाटलांची चुप्पी, धंगेकरांना वेगळीच शंका

Uddhav Thackeray : शेतकरी भाजपमध्ये आले तर कर्जमाफी? दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना टोला

Maharashtra Live News Update: शिवसेनेकडून पूरग्रस्तांसाठी एक लाख 11 हजार रुपयांची मदत मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सुपूर्द

Dasara 2025: दसऱ्याला झेंडूची फुले का वापरली जातात? धार्मिक आणि सांस्कृतिक महत्व

SCROLL FOR NEXT