Lavani Lavani
महाराष्ट्र

Lavani Dance: 'तमाशा अश्लील नाही, तर चावट, बदनाम करणं...' प्रसिध्द तमाशा कलावंत नेमकं काय म्हणाले?

DanceControversy Ban On Obscenity: सांस्कृतिक कलाकेंद्रात सुरू असलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर शेअर केला. या प्रकरणी प्रसिध्द तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी खंत व्यक्त केली.

Bhagyashree Kamble

रोहिदास गाडगे, साम टीव्ही

राज्यात डान्स बारवर बंदी असतानाही सांस्कृतिक कला केंद्रात खुलेआम डान्स बारसारखा प्रकार सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला होता. त्यांनी पत्रकार परिषद घेत सांस्कृतिक कलाकेंद्रात सुरू असलेल्या धिंगाण्याचा व्हिडिओ दाखवला. तसेच या अश्लील प्रकाराची पोलखोल केली. यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला. या प्रकरणी प्रसिध्द तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी खंत व्यक्त केली.

डिजेवर चालणाऱ्या डान्समुळे तमाशा कलावंत बदनाम होत आहेत. डिजेवरचा नंगानाच थांबला पाहिजे, मगच आमचे तमाशे व्यवस्थित चालतील. सुरेखा पुणेकरांनी लावणीला चांगला दर्जा दिला आहे. मात्र नंतरच्या काळातील मुलींनी लावणीचं विटंबन केलं असल्याचं रघुवीर खेडकर म्हणाले आहेत.

आजच्या तरूणी लावणीच्या गाण्यांवर अश्लील नृत्य करत आहेत. डिजेच्या गाण्यांवर ठेका धरतात. जे अत्यंत चुकीचे आहे. याचा थेट परिणाम लोककला असलेल्या तमाशावर होत आहे. याला आळा बसला पाहिजे, असं खेडकर म्हणालेत. पुर्वीचे सरकार तामाशा कलावंताना आश्वासन देत होती. मात्र, आताचे सरकार लोक कलावंताबाबत बोलतच नाही, अशी खंतही खेडकर यांनी व्यक्त केली. तमाशातली माणसं माणसं नाहीत का? याच्यावर राजकारण करू नका, असंही खेडकर म्हणाले आहेत.

पत्रकार परिषद घेत सुरेखा पुणेकर यांनी कलाकेंद्रात डान्स बार सुरू असल्याचे धक्कादायक व्हिडिओ दाखवले. तसेच राज्यात ८२ पैकी ४२ कला केंद्रात डान्स बार, डीजे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या डान्सबारवर तात्काळ बंदी आणली पाहिजे. या कारणामुळे संगीतकार, कलाकार आणि वाजंत्री हे देशोधडीला लागले असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT