माजी मंत्री मधुकरराव पिचड साम टीव्ही
महाराष्ट्र

खासदार लोखंडे म्हणाले, "निळवंडे"साठी पिचड यांचे योगदान

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर: निळवंडे धरणाच्या निर्मितीचा विषय नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असतो. पिचड यांच्या योगदानही चर्चिले जाते. त्यांच्याबद्दल शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांनी पुनरूच्चार केला आहे.

निळवंडेसाठी निधी उपलब्ध करण्यासाठी सर्वांचेच मोलाचे मार्गदर्शन झाले आहे. माजी मंत्री मधुकर पिचड यांचेही निळवंडे पुनर्वसनासाठी मोठे योगदान असल्याची कबुली खासदार सदाशिव लोखंडे यांनी राजूर येथे बोलताना दिली.

आज राजूर येथे खासदार लोखंडे माजी मंत्री मधुकर पिचड यांना भेटण्यासाठी आले होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले राजूर येथे पिचड यांच्या निवासस्थानी येणार असल्याने त्यांच्याकडे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची गर्दी होती.Contribution of Madhukarrao Pichad for Nilwande Dam abn79

मंत्री येण्यापूर्वीच लोखंडे आल्याचे समजताच माजी मंत्री मधुकर पिचड यांनी लोखंडे यांचे स्वागत केले. यावेळी खासदार यांच्या सोबत त्यांचे कार्यकर्ते व संतोष मुर्तडक होते.

साहेब तब्येतीची काळजी घ्या, यापुढेही मार्गदर्शन करा, असेही लोखंडे म्हणाले. माजी मंत्री मधुकर पिचड यांनी मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाचा धागा पकडून खासदार म्हणून तुमचे काम चांगले आहे. आमच्या तालुक्यातील धरणात व प्रकल्पात विस्थापित झालेल्या आदिवासी जमिनीवर ७/१२ वर महाराष्ट्र शासन नाव लावून शेतकऱ्याला इतर हक्कात टाकणार असून आपण आमचा आवाज संसदेत पोहचवा.

शेतकऱ्यांनी लोखंडे यांना निवेदन दिले. विजय भांगरे यांनी भंडारदरा येथील विल्सन डॅमचे नाव बदलून क्रांतीवीर राघोजी भांगरे द्यावे याचेही निवेदन दिले. त्यावर खासदार सदाशिव लोखंडे यांनी याबाबत मुख्यमंत्री व संबधित खात्याला पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पिचड यांचे दर्शन घेऊन ते पुन्हा शिर्डीकडे रवाना झाले.Contribution of Madhukarrao Pichad for Nilwande Dam abn79

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT