Anil Patil NCP Saam Tv
महाराष्ट्र

Anil Patil : पुढील काळात काँग्रेसला अजून धक्के बसतील; मंत्री अनिल पाटील यांचा दावा

Bharat Jadhav

सागर निकवाडे, नंदुरबार

Anil Patil NCP Ajit Pawar Group:

येत्या काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे महायुतीकडं मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे. नंदुरबार शहरातील नाट्यमंदिर सभागृहात महायुतीची बैठक पार पडली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील फुटीवर मोठा गौप्यस्फोट केलाय. पुढील काळात अनेक नेते काँग्रेसचा हात सोडून आमच्याकडे येतील असं ते म्हणालेत. (Latest News)

४५ प्लस जागा जिंकायच्या आहेत

महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्मुला मला माहीत नसून वरिष्ठ ठरवतील जो निवडून येणार असाच उमेदवार लोकसभेसाठी दिला जाणार आहे. ज्या पक्षाच्या उमेदवार निवडून आला आहे. त्याच पक्षाच्या उमेदवार दिला जातील असं मला वाटतं राज्यात ४८ पैकी ४५ प्लस जागा कशा निवडून येतील यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत. कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, एकीकडे इंटरनॅशनल मार्केट डाऊन असताना सुद्धा महाराष्ट्राची सरकार चांगला हमीभाव कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देत आहे. सध्या कापसाला सात हजाराच्या भाव मिळत असून, नऊ हजार पर्यंतच्या भाव कसा दिला जाईल यासाठी प्रयत्न करत असून, येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला भाव मिळेल असं पाटील म्हणाले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवसेनेच्या निकाल लागला असून आता राष्ट्रवादीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. आमच्या पूर्णपणे न्यायालयावर विश्वास असून संख्याबळ आमच्याकडे अधिक आहेत. ते कागदावर सिद्ध झाला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग आणि अपात्रतेच्या येणारा निर्णय असेल तो मी प्रतोद असून मला आत्मविश्वास आहे निर्णय आमच्या बाजूने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

काँग्रेसचे माजी मंत्री मिलिंद देवरा शिंदे गटात गेल्याने काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा रंगली असून यावर मंत्री अनिल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे अनेक आजी माजी आमदार, खासदार, आणि पदाधिकारी संपर्कात असून राष्ट्रवादी सोबतच भाजप आणि शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर विकासाच्या विचार करून प्रवेश होणार आहेत. येणाऱ्या काळात काँग्रेसमध्ये अनेक धक्के बसताना दिसतील असं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT