नाशिक: देशातील लोकशाही आणि संविधान आम्हाला वाचवायचं आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली देशातील लोकशाहीला धोका निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडलीय, लोकं बेरोजगार झाले आहेत असे अनेक आरोप माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहेत. मोदींना केवळ भाषणबाजी करुन त्यांना केवळ निवडणुका जिंकायच्या आहेत देशाकडे मोदींचं लक्ष नाही असे गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केले आहेत. त्याचबरोबर आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस (Congress) स्वबळावर लढाणार असल्याचे स्पष्ट केले आहेत.
मोदींची हुकूमशाही वाटचाल सुरु आहे, त्यांची हुकूमशाहीकडे वाटचाल फक्त काँग्रेस रोखू शकतो. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच चव्हाण यांनी दिले आहेत. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काही तडजोडी करून महाविकास आघाडी तयार केली. चंद्रकांत पाटील भाजप किती लवकर सत्तेत येतो, याची स्वप्न पाहतयात, त्यांनी स्वप्न पाहत रहावी अशी खोचक टीका माजी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं काम व्यवस्थित सुरु आहे, फक्त आताच त्यांचं ऑपरेशन झालंय, ते वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांच्या फिरण्यावर काही बंधनं आहेत असेही ते म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.