nana patole news
nana patole news  saam Tv
महाराष्ट्र

Akola : 'छत्रपती शिवाजी महाराज कुणबी होते, कुणबी समाजाने देशाला नेतृत्व दिले'; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य

अॅड. जयेश गावंडे

Nana Patole News : लोकशाहीमध्ये प्रत्येक समाजाला आपल्या समाजाचे नेतृत्व तसे राहावे असे वाटणे हे काही गैर नाही. कुणबी समाजाने राज्याला नेतृत्व दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने कुणबी होते, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अकोल्यातील एका कार्यक्रमात केले. (Latest Marathi News)

अकोला जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे कुणबी समाजाच्या कार्यक्रम ठिकाणी नाना पटोले (Nana Patole) हे माध्यमांशी बोलत होते. नाना पटोले पुढे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य कसे असावे याचे राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजाचे नेतृत्व राहावे, ही काळाची गरज आहे. कुणबी समाज हा अन्नदाता आहे, देशाचा पोशिंदा आहे'.

'राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्या तुम्ही करू नका. ज्या व्यवस्थेने तुम्हाला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, त्या व्यवस्थेला आत्महत्या करण्यास तुम्ही भाग पाडा, असे आवाहन करण्यासाठी मी इथे आलो आहे, असे ते म्हणाले.

'कुणबी समाज, ओबीसी समाजामध्ये माझ्यापेक्षा ही अनेक नेतृत्व आहेत. काय असतं की वेळ आणि नशीब हे प्रत्येकाचे कसे असते हे त्यावर अवलंबून आहे. प्रत्येकाला समाजाचे देणे लागते. प्रत्येकाची समाजासाठी कार्य करण्याची जबाबदारी असते, असे नाना पटोले पुढे म्हणाले.

'माझ्या अपेक्षा काय असतील या पेक्षा माझ्या समाजाच्या व ओबीसी समाजाच्या अपेक्षा काय आहे, यासाठी काम करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून काम करण्याचा नाना पटोले यांचा प्रयत्न असतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण : तिघे निर्दोष, दोघांवर गुन्हा दाखल

narendra Dabholkar: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

Chardham Yatra: आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात, जाणून घ्या, केदारनाथ मंदिराचे दरवाजे किती वाजता उघडतील

Sanjay Raut : आम्हाला भाड्याने लोक आणावे लागत नाहीत; संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्या मनसेला टोला

T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकपसाठी श्रीलंकेचा संघ जाहीर! RCB च्या शिलेदाराकडे नेतृत्वाची जबाबदारी

SCROLL FOR NEXT