Mahavikas Aghadi  india today
महाराष्ट्र

Rajyasabha Election: काँग्रेसची नवी खेळी, राज्यसभेच्या एका जागेवर दावा; उद्धव ठाकरेंपुढे नवा प्रस्ताव

Congress Stakes Claim on Rajya Sabha Seat: राज्यसभेसाठी महायुतीला ६ आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळाली आहे. राज्यसभेच्या या एका जागेवर आता काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेसने उद्धव ठाकरेंपुढे नवा प्रस्ताव ठेवला आहे.

Priya More

Summary -

  • काँग्रेसने महाविकास आघाडीच्या एकमेव राज्यसभेच्या जागेवर दावा ठोकला

  • उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून जागा देण्याची केली विनंती

  • काँग्रेसने उद्धव ठाकरेंपुढे नवा प्रस्ताव ठेवला

  • बदल्यात विधान परिषदेची जागा देण्याचा प्रस्ताव

गिरीश कांबळे, मुंबई

राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या एकमेव राज्यसभा जागेवर दावा ठोकला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा करून ही जागा काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे. त्याबदल्यात विधान परिषदेची रिक्त होणारी जागा उद्धव ठाकरे यांना देण्याचा प्रस्ताव काँग्रेसकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसच्या मते, या निर्णयामुळे राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी अधिक मजबूत होण्यास मदत होईल. या घडामोडींवर शरद पवार यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांसाठी १६ मार्चला निवडणूक होणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार महायुतीला ६ जागा आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळणार आहे. या एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरू आहे. तिन्ही पक्षांमध्ये या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे.

काय आहे गणित?

राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी संबंधित पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के (२५ सदस्य) संख्याबळ असणे आवश्यक आहे. राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या २४५ असून सध्या काँग्रेसकडे २७ सदस्य आहेत. मात्र यावर्षी होणाऱ्या ७२ जागांच्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ २५ च्या खाली जाण्याची भीती काँग्रेसला आहे.

विशेषतः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यकाळ जूनमध्ये संपत असून विरोधी पक्षनेतेपद टिकवणे काँग्रेससाठी महत्त्वाचे मानले जात आहे. महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्याने ती जागा पुन्हा जिंकणे काँग्रेससाठी प्रतिष्ठेचे आणि तांत्रिकदृष्ट्या आवश्यक ठरत आहे.

निवडणुकीचे टप्पे -

१६ मार्च : ३७ जागा

२४ जून : २४ जागा

११ नोव्हेंबर : ११ जागा

काँग्रेससमोरील आव्हान -

पहिल्या टप्प्यातील ३७ जागांपैकी काँग्रेसचे अभिषेक मनु सिंघवी, फुलोदेवी नेताम आणि केटीएस तुलसी यांच्यासह काही नेत्यांचा कार्यकाळ संपत आहे. या जागा राखण्यात अपयश आल्यास काँग्रेसला राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्रातील तुलनेने सुरक्षित मानली जाणारी जागा मिळवण्यासाठी काँग्रेस आग्रही असून, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचा अंतिम निर्णय काय असेल याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT