Lok Sabha Election Saam TV
महाराष्ट्र

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; विजयासाठी आखली रणनीती

Lok Sabha Election News: प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.

Ruchika Jadhav

सुनिल काळे

Congress Strategy:

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व विभागात विभागनिहाय बैठकांचे आयोजन केले आहे. १८ जानेवारी रोजी अमरावती येथून या बैठकांना सुरुवात होत आहे.

नवनियुक्त प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली या बैठका होत आहेत. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती असणार आहे.

तसेच विधान परिषद गटनेते सतेज बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष, काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य चंद्रकांत हंडोरे, आ. यशोमती ठाकूर, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान, बसवराज पाटील, आ. कुणाल पाटील, राज्यातील माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दोन सत्रात या बैठका होणार आहेत. विभागीय बैठक सकाळी १० ते दुपारी १ वाजेदरम्यान व दुपारी २.३० ते ५.३० या वेळेत होणार आहेत.

अमरावती विभागाची बैठक दिनांक १८ जानेवारी रोजी होणार आहे. नागपूर विभागाची बैठक गडचिरोली येथे दिनांक २० जानेवारी रोजी होत आहे. तर पश्चिम महाराष्ट्राची बैठक पुणे येथे दिनांक २३ जानेवारी रोजी होणार आहे.

कोकण विभागाची बैठक भिवंडी येथे २४ जानेवारी रोजी, उत्तर महाराष्ट्र विभागाची बैठक धुळे येथे २७ जानेवारी रोजी तर मराठवाडा विभागाची बैठक लातूर येथे दिनांक २९ जानेवारी रोजी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Varsha Usgaonkar: वर्षा उसगांवकरांचा जन्मभूमीवर खास बहुमान; गोवा राज्य चित्रपट महोत्सवात 'या' पुरस्काराने सन्मानित

Screen time effects on kids: वाढत्या स्क्रीन टाइममुळे मुलांमध्ये वाढतेय चिडचिडेपणाची समस्या; कसं कराल स्क्रीन टाईम मॅनेजमेंट?

Maharaja Palace History: शाही घराण्याचा गौरव, सांस्कृतिक वारसा असलेल्या कोल्हापूरच्या ऐतिहासिक पॅलेसची माहिती

अरबी समुद्रात वाऱ्याने दिशा बदलली, मुंबईत पावसाचं रौद्ररूप, IMD कडून रेड अलर्ट, शाळाही बंद

SCROLL FOR NEXT