Rahul Gandhi News Saam Tv
महाराष्ट्र

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी आज मुंबईत; भारत जोडो न्याय यात्रेचा होणार समारोप

Rahul Gandhi News: कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज मुंबईत संपणार आहे. आज सकाळपासून या अंतिम टप्प्यातील रॅलीला सुरुवात होणार आहे.

Rohini Gudaghe

Rahul Gandhi In Maharashtra

कॉंग्रेस (Congress) नेते राहुल गांधी सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांची मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा मणिपूरपासून सुरू झालेली आज मुंबईत संपणार आहे. आज सकाळपासून या अंतिम टप्प्यातील रॅलीला सुरुवात होणार आहे. दिल्लीसह महाराष्ट्रातील अनेक नेते मुंबईत दाखल झाले (Maharashtra Politics) आहेत. (latest politics news)

मुंबईत अनेक ठिकाणी राहुल गांधी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. कळवा, मुंब्रा, माटुंगा लेबर कॅम्प आणि धारावी या प्रमुख भागात आज राहुल गांधी स्थानिकांशी संवाद साधणार (Rahul Gandhi) आहे. दादर येथील चैत्यभूमी हे भारत जोडो यात्रेत शेवटचं ठिकाण आहे. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष आजच्या या सभेकडे लागलेलं आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारत जोडो न्याय यात्रा ठाण्यात

शिवसेना, बाळासाहेब ठाकरे यांच्यासह शिवसैनिकांसाठी आदराचं ठिकाण असलेल्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर दिसणार (Rahul Gandhi News) आहे. याच मैदानातून बाळासाहेब ठाकरेंनी अनेकदा काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. त्याच मैदानावर आज राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आज एकत्र येणार आहेत.

कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा थोड्याच वेळात ठाण्यातील जांभळी नाका या ठिकाणी येणार आहे. महाविकास आघाडीच्यावतीने राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली (Bharat Jodo Nyay Yatra) आहे. तसेच आज वाहतुक कोंडी होऊ नये, यासाठी वाहतुक पोलिसांच्या वतीने वाहतुक नियमन देखील करण्यात आले आहे.

राहुल गांधी आज मुंबईत

राहुल गांधी ठाण्यातील शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणार आहेत. त्यानंतर जांभळी नाका येथे राहुल गांधी यांची चौक सभा होणार (Bharat Jodo Nyay Yatra In Maharashtra) आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा १२ मार्चपासून महाराष्ट्रात होती. नंदुरबार येथून ही यात्रा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांच्या धुळे, नाशिक या ठिकाणी सभा पार (Rahul Gandhi In Maharashtra) पाडल्या. धुळे शहरात महात्मा गांधी पुतळा येथून मनोहर टॉकीजपर्यंत जुना आग्रा रोड मार्गे रोड शो पार पडला होता. आपल्या सभांमध्ये त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT