Amravati News
Amravati News Saam tv
महाराष्ट्र

Navneet Rana News: नवनीत राणांच्या हिंदुत्ववादी राजकारणाविरोधात काँग्रेसची नवी चाल, राजकीय खेळीने सर्वच चकीत

साम टिव्ही ब्युरो

अमर घटारे

Amravati News: अमरावतीत खासदार नवनीत राणा यांनी राजकारणात चांगलाच जम बसवला आहे. अमरावतीत नवनीत राणा यांनी त्यांची राजकीय दिशा हिंदुत्ववादी राजकारणाकडे वळवली आहे. नवनीत राणा दिवसेंदिवस हिंदुत्ववादावरून आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. याचदरम्यान, अमरावतीत राणा यांना रोखण्यासाठी काँग्रेसने नवी राजकीय खेळी खेळली आहे. (Latest Marathi News)

अमरावतीत आता खासदार नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादासाठी आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. नवनीत राणा यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सरकारविरोधात हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून अनेक आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. यामुळे अमरावतीत नवनीत राणा यांना शह देण्यासाठी काँग्रेसने नवी राजकीय शक्कल लढवली आहे.

अमरावतीत काँग्रेसने हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला अमरावतीत एका कार्यक्रमाचे आयोजत केलं आहे. काँग्रेस अमरावतीत चक्क हनुमान जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा व हनुमान चलीसा पठण करणार आहे. एकंदरित अमरावतीत हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.

अमरावतीत खासदार नवनीत राणा हिंदुत्वाचा नारा देत असल्याचे काँग्रेसही तोडीस तोड देण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. अमरावतीत राजकीय जम बसवलेल्या नवनीत राणा यांनी शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांना पराभूत केले.

नवनीत राणा यांनी अडसूळ यांना ४८ हजार मतांनी पराभूत केली. नवनीत राणा यांच्या राजकीय भूमिकेनंतर काँग्रेसने अमरावतीत घेतलेल्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राणा दाम्पत्य अमरावतीत चांगलेच सक्रिय झाले आहेत. तर नवनीत राणा यांना लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला होता. मात्र, सध्या नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली असून त्यांच्या राजकारणाची दिशा भाजपच्या विचारधारेकडे झुकत चालल्याचे दिसून येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA, Final: नॉर्मल वाटलोय का? पहिल्याच षटकात विराटचे यान्सेनला 3 क्लासिक चौकार! पाहा VIDEO

Ind vs SA T20 WC Match Live Updates : विराटला मिळाली अक्षरची जोड; 'बापू'कडून आफ्रिकन गोलंदाजांची झोडाझोड

IND vs SA Final T20 World Cup: अंतिम सामन्यात भारताचा विजय व्हावो! सिद्धीविनायकाच्या चरणी पोहोचला चाहता

IND vs SA : टीम इंडियाची टॉप ऑर्डर फ्लॉप; दिग्गज ३ फलंदाज तंबूत, विराट कोहली मैदानात तळ ठोकून

VIDEO: काय आहे RTO लायसेन्स घोटाळा? विरोधकांचा सरकारवर गंभीर आरोप, वाचा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT