mla sanjay jagtap, purandar, mahavitran saam tv
महाराष्ट्र

Congress आमदारांचे Mahavitran च्या कारभारा विराेधात बेमुदत उपाेषण सुरु

विजजोड, खांब, तारा, मिटर देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे.

मंगेश कचरे

Purandar News : पुरंदरचे काॅंग्रेस पक्षाचे आमदार संजय जगताप यांनी महावितरणच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरू केले आहे अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार अरेरावी भाषा आणि अकार्यक्षमता याच्या विरोधात उपोषणा बरोबरच आमदार जगताप यांनी जन आंदोलन देखील सुरू केला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार आमदार संजय जगताप यांनी साम टीव्हीशी बाेलताना व्यक्त केला.

सासवड येथील शिवतीर्थावर आमदार जगताप हे उपोषणास (aandolan) बसले आहेत. अनेक संघटनांनी त्याचबरोबर पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी शिवतीर्थावर उपस्थित राहून जगताप यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर महावितरणच्या विरोधात रोष देखील व्यक्त केला आहे.

आमदार संजय जगताप (mla sanjay jagtap) यांच्याबरोबर सुनिता कोलते, मनिषा बडदे, स्वाती गिरमे, राजगौरी जगताप, निलम होले, प्रकाश पवार, तुषार माहूरकर, विठ्ठलराव मोकाशी, अनिल जाधव, महेंद्र माने, गोरखनाथ खेडेकर, चंद्रकांत बोरकर, माणिक भोंडे, नितीन भोंगळे, सागर जगताप, संतोष जगताप आणि चंद्रकांत हिवरकर हे देखील उपोषणाला बसले आहेत.

यावेळी उपस्थित महावितरणच्या अधिकाऱ्यांपुढे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या (farmer) आलेल्या तक्रारींचा पाढा वाचला. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदारांविरोधात अनेक तक्रारी आल्या आहेत. यातील अनेक बाबी माझ्याही निदर्शनास आल्या असून याबाबत वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना लेखी आणि तोंडी सांगून त्यांच्या वर्तनात आणि कारभारात फरक पडला नाही.

शासनाची मंजूर असलेली ८६ रोहित्र सर्वसामान्य नागरीकांसाठी न बसविता ती व्यावसायिक आणि कारखानदारांच्या सोयीसाठी भ्रष्टाचार करून बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

विजजोड, खांब, तारा, मिटर देण्यास नेहमीच दिरंगाई होत आहे. दोन - दोन वर्षे घरगुती आणि शेती पंपासाठी विजजोड मिळत नाही. शेतीपंपाचे मिटर रीडिंग न घेता अंदाजे हजारो - लाखो रूपयांची वीजबील शेतकऱ्यांच्या माथी मारून ती भरण्यासाठी दबाव आणला जात आहे.

या आणि यासारख्या अनेक अडचणी महावितरणकडून (mahavitran) निर्माण करून ग्राहकांना मनस्ताप देण्यात येत असून महावितरणच्या या भोंगळ कारभाराचा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचा समाजातील सर्वच घटकांना होत असलेला त्रास थांबविण्यासाठी, अधिका-यांचा मुजोरपणा आणि भ्रष्ट कारभार मोडीत काढून त्यांना वठणीवर आणण्यासाठी मला नाईलाजाने उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला असे आमदार संजय जगताप यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gautam Gambhir: अर्शदीपला माफी मागायची गरज नव्हती, फायनलमधील झालेल्या राड्यावर गौतम स्पष्टच बोलला

Monalisa Wedding: कुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाने पळून जाऊन केलं लग्न, कोण आहे तिचा नवरा? महाराष्ट्राशी आहे खास कनेक्शन

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

LPG Gas : घरगुती गॅस सिलिंडरवर ३०० रूपयांची सूट, पण कशी? कुणाला मिळणार लाभ? वाचा सविस्तर

LPG ships : मोठी बातमी! नागपूरची २ जहाजे इराणच्या हॉर्मुझमध्ये अडकली, केंद्र सरकारनं दिले महत्त्वाचे आदेश

SCROLL FOR NEXT