Bhadara Congress Leader Car Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident: काँग्रेसच्या महिला नेत्याच्या कारला भीषण अपघात, वाहनाचा झाला चुराडा

Bhadara Congress Leader Car Accident: भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या बड्या महिला नेत्याच्या कारला भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये कारचा चुराडा झाला.

Priya More

Summary -

  • भंडाऱ्यात काँग्रेस नेत्या संगीता बेनीवाल यांच्या कारला अपघात

  • दोन कारची समोरासमोर जोरदार धडक

  • काँग्रेस नेत्याच्या कारचा चुराडा

  • अपघातात एक जण जखमी

  • अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही

शुभम देशमुख, भंडारा

भंडाऱ्यामध्ये काँग्रेसच्या महिला नेत्याच्या वाहनाला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कारने काँग्रेस नेत्याच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या वाहनाचा चुराडा झाला. या अपघातामध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अपघातामध्ये काँग्रेस नेत्याच्या कारचा कारचा चालक किरकोळ जखमी तर अन्य सर्वजण सुखरूप बचावले.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थान महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि काँग्रेस पक्षाच्या भंडारा जिल्हा निरीक्षक संगीता बेनीवाल यांच्या कारला भीषण अपघात झाला. भंडाऱ्याच्या तुमसर येथील खापा चौकात या भीषण अपघाताची घटना घडली. समोरून आलेल्या कारने संगीता बनीवाल यांच्या कारला जोरदार धडक दिला. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे पुढील भागाचा चुराडा झाला.

या भीषण अपघातामध्ये काँग्रेस नेत्या बेनिवाल यांच्या कारच्या बोनेटसह समोरिल भागाचं मोठं नुकसान झाले. या अपघातात बेनिवाल यांच्या कारकच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असून वाहनातील सर्वजण सुखरूप बचावलेत. बेनिवाल या तीन दिवसांपासून भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या. तुमसर येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्या नागपूरच्या दिशेने निघाले असताना हा अपघात घडला.

अपघात झाला त्यावेळी कारमध्ये संगीता बेनीवाल यांच्यासोबत काँग्रेस पक्षाच्या प्रदेश महासचिव कुंदा राऊत, भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा जयश्री बोरकर या होत्या. सुदैवानं या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. या अपघातामुळे खापा चौकात काही वेळ वाहतूक कोंडी झाली. या अपघाताचा तपास भंडारा पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT